Elon Musk will Resign : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून एलन मस्कची (Elon Musk) ओळख होती. पण जेव्हा ट्विटरची मालकी घेतल्यापासून सातत्याने चर्चेत असलेले एलॉन मस्क (Elon Musk) आता यांच्या नव्या ट्विटने खळबळ माजली आहे. या ट्विटमध्ये एलॉन मस्क हे ट्विटरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले आहे. मस्क यांनी पोल (Elon Musk Twitter Poll) घेत युजर्सला त्यांचे मत विचारलंय, 'मी ट्विटरच्या CEO पदाचा राजीनामा द्यावा का? तुम्ही सांगाल तसं मी करेन.' मस्क यांच्या एका ट्विटमुळे (Elon Musk News Tweet) सगळीकडे एकच खळबळ उडाली. या पोलमध्ये 17.5 दशलक्ष वापरकर्त्यांनी प्रतिसाद दिला असून ज्यापैकी बहुतेकांना मस्कने ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली.
ट्विटरची मालकी असल्याचे एलॉन मस्क यांनी 19 डिसेंबर रोजी पहाटे 4.50 वाजता एक ट्विट केलं. या ट्वीटमध्ये मस्क यांनी युर्जसला विचारले आहे की, मी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा द्यावा का? या ट्वीटनंतर लोकांनी ट्विटरवर अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. सुमारे 1 लाख 30 हजार लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केले आहे. तर आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांनी मतदान केले आहे. ज्यामध्ये 57 टक्के लोकांनी मस्क यांनी राजीनामा देण्यासाठी समर्थनार्थ मतदान केले आहे.
Should I step down as head of Twitter? I will abide by the results of this poll.
— Elon Musk (@elonmusk) December 18, 2022
1.75 कोटी युजर्सनी फीडबॅक दिला
मस्क यांनी केलेल्या मतदानावर 17,502,391 मते दिली आहे. त्यापैकी 57.5 टक्के वापरकर्त्यांनी मस्कच्या राजीनाम्याच्या बाजूने मतदान केले.
वाचा : FIFA World Cup 2022 फायनलने तोडला 25 वर्षांचा Google Search रेकॉर्ड
एलॉन मस्क यांनी ऑक्टोबरमध्ये ट्विटरचा पदभार स्वीकारला. तेव्हापासून त्यांना त्यांच्या निर्णयाला सतत टीकेला सामोरे जावे लागत आहे. शुक्रवारी, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी ट्विटरवरून काही पत्रकारांची खाती निलंबित केल्याबद्दल मस्क यांच्यावर टीका केली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी हे धोकादायक उदाहरण म्हटले. मात्र, तीव्र टीका झाल्यानंतर काही तासांतच मस्क यांनी निर्णय मागे घेत पत्रकारांची खाती बहाल केली होती. मस्कने काही महिन्यांपूर्वीच ट्विटर विकत घेतले आहे. तेव्हापासून ते आणि ट्विटर सतत चर्चेत आले आहेत.
आगामी बदलाबद्दल मोठं वक्तव्य
एलॉन मस्क यांनी ट्विटरमध्ये आगामी काळात होणाऱ्या मोठ्या बदलांबद्दलही मोठं वक्तव्य केलं आहे. मस्क यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, 'मी माफी मागतो. असं पुन्हा होणार नाही. तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, 'तुम्हाला काय हवे आहे याची काळजी घ्या, कारण तुम्हाला ते मिळू शकते.' असे देखील म्हटले आहे.