मुंबई : जगप्रसिद्ध सोशल मेसेजिंग अॅप WhatsApp संदर्भातली सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. WhatsApp दरवेळी त्याच्या सेवा अपग्रेड करत असते. त्यामुळे जुन्या Device मध्ये व्हॉट्सअॅप चालवण अवघड होतं. आता अशीच एक अपडेट व्हॉट्सअॅप घेऊन आली आहे. ज्यामुळे स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप चालवण कठीण होणार आहे. त्यामुळे हे स्मार्टफोन नेमके कोणते असणार आहेत, ते जाणून घेऊयात. (whatsapp will not work on these smartphone android and iphone technology news)
व्हॉट्सअॅप त्याच्या सेवेमध्ये नवनवीन अपडेट घेऊन येत असते. या अपडेट व्हर्जनमुळे काही जुन्या डिवायसमध्ये व्हॉट्सअॅपची सेवा बंद होत असते. असे अनेकदा अनेक Device बाबत झाले आहे. आता असे iPhone च्या जुन्या Device बाबत होणार आहे.
आयफोनच्या अनेक जुन्या डिवायसमध्ये WhatsApp काम करणार नाही. येत्या 24 ऑक्टोबर 2022 पासून आय़फोनच्या iOS 10 आणि iOS 11 आवृत्त्यांमध्ये WhatsApp ची सेवा बंद होणार आहे.
iPhone 5 आणि iPhone 5c नवीनतम सॉफ्टवेअर आवृत्तीवर अपडेट केले जाऊ शकत नाहीत. यामुळे या उपकरणांवर व्हॉट्सअॅप काम करणार नाही. व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट फीचर्सवर नजर ठेवणाऱ्या WABetaInfo या साइटने याबाबतची माहिती दिली आहे.
सॉफ्टवेअर अपडेट
जर तुमचा आयफोन जुन्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करत असेल तर तुम्हाला तो नवीनतम ऑपरेटिंग सिस्टमवर अपडेट करणे आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन जनरल या पर्याय निवडावा लागेल. तुम्ही सॉफ्टवेअर अपडेटवर क्लिक करून नवीनतम iOS आवृत्ती स्थापित करू शकता.
दरम्यान सध्या iPhone च्या काही जुन्या डिवाईसवर WhatsApp बंद होणार आहे. या आधी काही अॅड्रॉईस स्मार्टफोनवर WhatsApp सोपर्ट करणं बंद झालं होतं.