मुंबई : आजच्या काळात मोबाईल ही अशी वस्तु बनली आहे, ज्याच्याशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. म्हणूनच तर मोबाईलफोन हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. अगदी सगळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण मोबाईलला आपल्यापासून लांब करत नाही. परंतु तुम्हाला माहितीय का, की जास्त फोन वापरण्याची तुमची सवय तुम्हाला अल्जायमरकडे घेऊन जात आहे. नुकतेच अल्झायमर रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे म्हटले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, सेल फोन आणि वाय-फायमधून निघणाऱ्या रेडिएशनमुळे लोकांच्या मेंदूच्या पेशींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण वाढत आहे, जे अल्झायमर रोगाचे मुख्य कारण आहे.
अल्झायमर हा एक आजार आहे ज्यामध्ये स्मरणशक्ती कमजोर होते. संशोधकांना त्यांच्या संशोधनात असे आढळून आले आहे की फोनच्या वापरातून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्सचा आपल्या मेंदूवर खूप वाईट परिणाम होतो.
संशोधकांचा असा विश्वास आहे की, सर्व वायरलेस कम्युनिकेशन सिग्नल आपल्या मेंदूतील कॅल्शियम वाहिन्यांद्वारे सक्रिय केले जातात. यामुळे, आपल्या मेंदूमध्ये कॅल्शियमचे प्रमाण अचानक वाढते, ज्यामुळे अल्झायमर रोग वेळेपूर्वी होऊ शकतो.
यावर दिल्लीतील मॅक्स हॉस्पिटलचे वरिष्ठ न्यूरोलॉजिकल कन्सल्टंट डॉ. राजीव गुप्ता सांगतात की, मोबाईल फोन, इंटरनेट आणि वाय-फायचे महत्त्व लोकांच्या आयुष्यात खूप वाढले आहे. अशा परिस्थितीत फोनचे दुष्परिणामही अधिक वाढले आहेत.
लोकांनी आता त्यांच्या छोट्या-मोठ्या गरजांसाठी फोनवरच अवलंबून राहायचे आहे. ज्यामुळे ते फोनशिवाय राहू शकत नाही. परंतु हे तुमच्या आरोग्यासाठी फारच धोकादायक आहे.
चोवीस तास फोनला चिकटून राहिल्यामुळे, लोकांना वजन वाढणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि डोळ्यांच्या समस्या वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
याशिवाय लोकांच्या मेंदूचा वापर कमी करून त्यांची स्मरणशक्तीही कमी झाली आहे.
याआधीही अनेक संशोधनांमध्ये असे आढळून आले आहे की, अल्झायमरशी संबंधित बदलांची लक्षणे ही लोकांच्या वयोवर्षे 25 आधीच दिसू लागतात. संशोधनात त्याचा असा ही परिणाम दिसून आला आहे की, जर आपला मेंदू दीर्घकाळ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या प्रभावाखाली असेल, तर अल्झायमरची समस्या वृद्धापकाळाच्या आधीच येऊ शकते.
डॉक्टरांच्या मते, अल्झायमर असलेल्या लोकांचे सरासरी वय गेल्या 20 वर्षांत कमी झाले आहे.
जगभरातील लोकांच्या वायफाय आणि फोनच्या रेडिएशनच्या वाढत्या प्रभावामुळे हे घडले आहे. एक प्रकारे, आपण या आजाराला डिजिटल डिमेंशिया असेही म्हणू शकतो.