'Xiaomi Redmi Note 5'चे फिचर्स लिक

शाओमीच्या रेडमी नोट 5 या फोनची फिचर्स लिक झाले आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल रेअर कॅमेरे असतील. 

Updated: Oct 4, 2017, 07:16 PM IST
'Xiaomi Redmi Note 5'चे फिचर्स लिक  title=

मुंबई : शाओमीच्या रेडमी नोट 5 या फोनची फिचर्स लिक झाले आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये ड्यूअल रेअर कॅमेरे असतील. तसंच कॅमेरासाठी LED फ्लॅशही देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनची बॉडी मेटलची असून फोनला फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

शाओमी रेडमी नोट 5 ची स्क्रीन 5.5 इंचांची आहे. तर फोनचं रिजोल्यूशन 1080 पिक्सल असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 630 किंवा 660 सीरिजचा प्रोसेसर असू शकतो.

3GB रॅम आणि 32GB/64GB, 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, USB Type-C पोर्ट, क्विक चार्ज 3.0 सपोर्ट आणि 3790mAh ची बॅटरी या फोनमध्ये असण्याची शक्यता आहे.

रेडमी नोट 5 हा फोन 3GB+32GB, 4GB+32GB आणि 4GB+64GB मध्ये उपलब्ध असेल. या फोनची किंमत 11,800 रुपये, 13,800 रुपये आणि 14,800 रुपयांपर्यंत असेल असा अंदाज आहे. कंपनीकडून मात्र याबाबत कोणतंच स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.