डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीमध्ये मंगळवारी प्रत्येकी एक-एक कोरोना रुग्ण आढळला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 12वर पोहचली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डोंबिवली पूर्व परिसर पूर्णत: बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यााबाबत माहिती दिली.
डोंबिवली पूर्ण परिसरात 5 कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पूर्व भागातील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी, आहिरे गाव, सहकारनगर, म्हात्रेनगर हे परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णपणे बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गरज नसल्यास, अत्यावश्यक नसल्यास नागरिकांना बाहेर पडण्यास पूर्णपणे प्रतिबंध घालण्यात येणार आहेत. आयुक्तांनी नागरिकांना गरज नसल्यास घराबाहेर न पडण्याचं, संपूर्ण सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
डोंबिवली पूर्व परिसर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पूर्णतः बंद
कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीनुसार डोंबिवली पूर्व येथील राजाजी पथ, विजयनगर, बालाजी गार्डन, कोपर स्टेशन झोपडपट्टी व आहिरे गांव, सहकारनगर हे भाग प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पुर्णतः बंद करण्यात आलेले आहेत. pic.twitter.com/2NIgrMFqPU
— Kalyan Dombivli Municipal Corporation (@KDMCOfficial) March 31, 2020
कल्याणमध्ये एक महिला तर डोंबिवलीत एका मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली, कल्याणमधील नव्या रुग्णावर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांचा एकूण आकडा आता १२ वर पोहचला आहे. तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय. दरम्यान, तुर्कस्तानहून आलेला कोरोना बाधित रुग्ण लग्न आणि हळदीला उपस्थित राहिल्याने कल्याणमध्ये कोरोनाने प्रवेश केल्याची माहिती आहे.