Thane Ring Metro: मुंबईसह महानगरात मेट्रोचे जाळे वेगाने पसरत आहे. MMRDAतील शहरांना मुंबईशी जोडण्यासाठी मेट्रोचे प्रकल्पाचे काम वेगात सुरू आहेत. 2025 मध्ये दोन मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होऊ शकतात. तसंच, ठाणे शहरातही आता मेट्रो धावणार आहे. त्यामुळं ठाणेकरांचा प्रवास आरामदायी आणि सुकर होणार आहे. ठाण्यातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणजे ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प. या प्रकल्पाबाबत एक महत्त्वाची अपडेट
ठाणे इंटिग्रल रिंग मेट्रो प्रकल्प कॉरिडॉरसाठी जिओ-टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन (GTI) सुरू केले आहे. हा महत्त्वकांक्षी कॉरिडॉर 29 किमीचा असूण यात 22 स्थानके असणार आहेत. तर यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. 2029 पर्यंत ही मेट्रो सेवेत येऊ शकते. विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी हा प्रकल्प फायद्याचा ठरणार आहे. कारण यामुळं प्रवाशांना जलद आणि किफायतीशर प्रवास करता येणार आहे. हा प्रकल्प ठाण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. ठाण्यातील वाढती वाहतूक कोंडीवर या प्रकल्पामुळं थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
महामेट्रोला एकूण कॉरिडॉरच्या अंदाजे 8 किमीच्या डिझाइनसाठी पाच सल्लागारांकडून प्रस्ताव झाले आहेत. या कंपन्यांमध्ये RITES लिमिटेड, STUP सल्लागार, LKT अभियांत्रिकी सल्लागार आणि दोन फेंच कंपन्यांना भारतीय उपकंपन्या Enia Design आणि Systra MVA Consulting यांचा समावेश आहे.
ठाणे इंटिग्रल मेट्रो प्रकल्प हा 29 किमी लांबीचा असून यातील 26 किमी लांबीचा मार्ग हा उन्नत असून 3 किमीचा मार्ग भूमिगत आहे. या प्रकल्पांतर्गंत 22 स्थानके असून त्यातील दोन स्थानके भूमिगत असणार आहेत. त्यातीलच एक भूमिगत स्थानक थेट ठाणे रेल्वे स्थानकाला जोडले जाणार आहे. तर, अन्य स्थानके मेट्रो कॉरिडॉरला जोडली जाणार आहेत.
रायला देवी, वागळे सर्कल, लोकमान्य नगर बस डेपो, शिवाजी नगर, नीळकंठ टर्मिनल, गांधी नगर, डॉ काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, मानपाडा, डोंगरीपाडा, विजयनगरी, वाघबीळ, वॉटरफ्रंट, पाटलीपाडा, आझाद नगर बस स्टॉप, मनोरमा नगर, बाळकुम नाका, बाळकुंम पाडा, राबोडी, ठाणे जंक्शन (भूमिगत) आणि नवीन ठाणे या स्थानकांचा समावेश असणार आहे.