मुंबई : अवेळी, तसेच लगेच झोपे येणे धोकायदायक आहे, अशी झोप टाळली पाहिजे, कारण दुपारी जेवल्यानंतर एक छोटी डुलकी घ्यायची सवय काहींना असते.
जेवल्यावर लगेच झोपणे धोकादायक ठरू शकतं. कारण जेवल्यानंतर, नाष्टा केल्यानंतर किंवा काहीही खाल्यानंतर झोपणं हे शरीराच्या आरोग्यासाठी हानिकारक मानलं जातं.
जेवल्यावर तातडीने झोपल्यास पोटात गेलेल्या अन्नाचं योग्य पद्धतीने पचन होत नाही. यामुळे शरीरात एक विशिष्ठ प्रकारचं आम्ल तयार होतं आणि ते छातीत जातं. यामुळे अनेक वेळा आंबट ढेकरही येतात. शिवाय अन्नाचं योग्य पद्धतीने पचन न झाल्यास अनेक आजार जडू शकतात.
जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच झोपलात तर, कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते. आपणं जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणं गरजेचं असतं. यामुळे शरीराचं कार्य उत्तम राहण्यास मदत होतं.
अॅसिडीटीमुळे शरीराला फार त्रास होतो, शिवाय झोपही लागत नाही. तातडीने झोपल्याने पोटात आम्ल तयार होतं. यामुळे अॅसिडीटी होण्याची दाट शक्यता असते.
जेवल्या जेवल्या झोपल्याने पचनक्रिया बिघडते. याचा परिणाम रक्तदाब आणि रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं. यामुळे हृदयावर परिणाम होऊन त्यासंबंधीचे आजार बळावू शकतात. त्यामुळे जेवल्यावर तातडीने झोप घेणे धोकेदायक आहे.