लंडन : अनेक सिनेमांमध्ये हिरो-हिरोईनच्या तोंडून आपण ऎकलं असेल की, पहिल्याच नजरेत आमचं प्रेम जुळलं. पहिल्याच नजरेत मला प्रेम झालं. त्यांच्या बोलण्यावरून अनेकजण त्यावर विश्वासही ठेवतात.
खरं बघायला गेलं तर असं काही नसतंच. हे आम्ही म्हणत नाही तर एका अभ्यासातून आलंय. एका अभ्यासातून समोर आलंय की, ‘लव्ह अॅट फर्स्ट साइट' असं काही नसतं.
खरंच पहिल्या नजरेत प्रेम? असं काही असतं का यावर नेदरलॅंडच्या एका युनिव्हर्सिटीतील सायकॉलॉजिस्टने याबाबत अभ्यास केलाय. अनेकांना हे वाचून निराशा होईल की, ज्या गोष्टीला तुम्ही पहिल्या नजरेतील प्रेम समजत होता ते प्रेम नाहीतर शारिरीक आकर्षण होतं.
शोधकर्त्यांनी ३९६ लोकांवर याचा अभ्यास केला. यात ६० टक्के महिलांचा समावेश ज्या हेट्रोसेक्शुअल होत्या आणि जास्तीत जास्त लोक डच आणि जर्मन होते. ऑनलाईन सर्व्हेच्या माध्यमातून त्यांच्या रिलेशनशीपबद्दल प्रश्न करण्यात आले. त्यानंतर त्यांना अनोळखी व्यक्तींचे फोटो दाखवण्यात आलेत. त्यांच्याप्रति आकर्षणाला प्रेम, इंटिमसी, पॅशन, कमिटमेंट आणि सेक्शुअल आकर्षणमध्ये रेटींग देण्यात सांगण्यात आले.
या प्रोसेसनंतर दोन आणखी अभ्यास करण्यात आले. ज्यात स्पीड डेटिंगची मदत घेण्यात आली. या सहभाग घेणा-यांनी ऎकमेकांसोबत ९० ते २० मिनिटे वेळ घालवला. त्यानंतर त्यांना पार्टनरबद्दल फिलिंग्स विचारण्यात आल्या. एकूण रिझल्ट पाहता ३२ लोकांनी(ज्यात सर्वात जास्त पुरूष होते) ४९ वेळा पहिल्या नजरेत प्रेम झाल्याचे बोलले.
या सगळ्याचा संबंध समोरचा व्यक्ती शारिरीक स्वरूपात किती आकर्षक होता याच्याशी आहे. जास्त आकर्षक व्यक्तीसोबत सहभागींना नऊ टक्क्यांनी जास्त वेळा पहिल्या नजरेत प्रेम झालं. पण स्पीड डेटिंगमध्ये कुठेही पहिल्या नजरेतील प्रेम म्युचुअल राहिलं नाही.
अभ्यासकांनी सांगितले की, ‘आम्ही या निष्कर्शावर पोहोचलो की, पहिल्या नजरेतील प्रेम ना पॅशनेट होतं ना सामान्य. प्रेम समोरच्या व्यक्तीवर डिपेन्ड करतं. हे खरं प्रेम नसतं तर दुस-या व्यक्तीप्रति सेक्शुअल आकर्षण असतं. रोमांचक गोष्ट ही राहिली की, अभ्यासा दरम्यान, जे लोक आधीपासून रिलेशनशीपमध्ये होते आणि त्यांना वाटलं की, पहिल्या नजरेत प्रेम झालं आहे. त्या लोकांनी रिलेशनशीपमध्ये जास्त पॅशन असण्याचं सांगितलं.