'मला प्रत्येक देशात माझं मूल हवं आहे', आधीच 87 मुलं असणाऱ्या स्पर्म डोनरने व्यक्त केली इच्छा, म्हणतो 'प्रत्येक महिला...'

स्वयंघोषित स्पर्म डोनेशन सीईओने आपण अनेक महिला ज्यांना कुटुंब सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यांना मदत केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Jan 16, 2025, 04:30 PM IST
'मला प्रत्येक देशात माझं मूल हवं आहे', आधीच 87 मुलं असणाऱ्या स्पर्म डोनरने व्यक्त केली इच्छा, म्हणतो 'प्रत्येक महिला...' title=

जगातील सर्वात प्रसिद्ध स्पर्म डोनर म्हणून ओळखला जाणारा काइल गोर्डी (Kyle Gordy) वर्षाच्या अखेरीस जगभरात 100 मुलांचा बाप होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत, लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या काइलने गर्भधारणेसाठी संघर्ष करणाऱ्या महिलांना मोफत सेवा दिली आहे ज्यामुळे आतापर्यंत 87 मुले झाली आहेत. न्यू यॉर्क पोस्टनुसार, काइल प्रेग्नंट नाऊ या वेबसाइटच्या आधारे मोफत सेवा देतो. नुकतंच त्याला आपण वर्षाच्या अखेरपर्यंत 100 मुलांचा आकडा ओलांडणार असल्याचं समजलं आहे. यानंतर हा टप्पा गाठणाऱ्या चार लोकांच्या एका विशेष गटात तो सामील होणार आहे. स्वीडन, नॉर्वे, इंग्लंड आणि स्कॉटलंडमध्ये 14 प्रलंबित गर्भधारणेसह, काइलने दावा केला आहे की, गरजूंना मदत करण्याच्या त्याच्या मोहिमेची सुरुवात करत आहे.

स्वयंघोषित 'स्पर्म डोनेशन सीईओ' काइलने आपण अनेक महिला ज्यांना कुटुंब सुरु करण्याचा निर्णय घेतला त्यांना मदत केल्याचा अभिमान असल्याचं म्हटलं आहे. त्याला आता टेलिग्राम फाऊंडर पॅवेल दुरोव ज्याची 100 जैविक मुलं आहेत त्याचा रेकॉर्ड मोडायचा आहे. 

काइल गोर्डी याने कोणताही ठराविक क्रमांक ठरवलेला नाही, पण जोपर्यत आपल्या सेवेची गरज आहे तोपर्यंत देत राहणार असल्याचं म्हटलं आहे. "आता हे सर्व अशक्य आहे असं वाटणाऱ्या या सर्व महिलांना कुटुंब सुरु करण्यासाठी मदत केली याचा मला आनंद आहे," असं तो म्हणाला आहे. 

दरम्यान आता थोड्या काळासाठी विश्रांती घेतल्यानंतर गोर्डीला आता 2025 मध्ये जागतिक पातळीवर पोहोचायचं आहे. जपान, आयर्लंड, कोरियासारख्या देशांमध्ये त्याला जायचं आहे. "मी अद्याप त्या देशांमध्ये डोनेशनसाठी पोहोचू शकलो नाही. कोणाला माहिती? 2026 पर्यंत प्रत्येक देशात माझं एक मूल असू शकतं," असं तो पुढे म्हणाला.

इतक्या मुलांचा बाप असतानाही आपण खरं प्रेम मिळवण्यासाठी संघर्ष करत असल्याचं म्हटलं आहे. यश मिळत नसल्यानेच आपण स्पर्म डोनेशनकडे वळल्याचं त्याने सांगितलं आहे. "मला काही महिलांनी संभाव्य नातेसंबंधात रस दाखवला असला तरी, पुढे काहीच होत नाही," असं दुःख त्याने व्यक्त केलं.

सध्या सुरु असलेल्या स्पर्म डोनेशन प्रक्रियेदरम्यान एखादं अर्थपूर्ण नातं निर्माण होईल अशा अशा त्याला आहे. "मला आयर्लंडची पत्नी असली तरी हरकत नाही. माझ्या एका मुलाची आई डब्लिनची आहे आणि ते आयर्लंडला खूप भेट देतात. म्हणून किमान मला माहित आहे की माझे काही कुटुंब तिथे आधीच आहे," असं तो म्हणाला.