जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलं आहे.
चीनमध्ये चार इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉ. ली यांनी जगासमोर आणला आहे. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे. ज्याचा आकार अगदी शेपटीसारखी आहे.
शेपूट नावाच्या हाडविरहित असलेल्या या भागाची लांबी अंदाजे 10 सेमी (3.9 इंच) असते. लॉक्ड स्पाइन ही एक प्रकारची स्थिती आहे जिथे पाठीचा कणा आसपासच्या ऊतींशी असामान्यपणे जोडलेला असतो. ही जोड मणक्याच्या पायथ्याशी उद्भवते, असं डॉक्टर म्हणतात.
या दुर्मिळ प्रकरणाने Douyin, चायनीज TikTok वर प्रतिक्रिया निर्माण केल्या, जिथे 11 मार्च रोजी व्हिडिओ शेअर केल्यानंतर 34,000 पेक्षा जास्त लाईक्स आणि 145,000 शेअर्स मिळाले.
मिररने दिलेल्या वृत्तानुसार, आईने मुलाची शेपूट काढण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र डॉक्टरांनी मुलाची शेपटी काढण्याचा विचार केला. शेपूट बाळाच्या मज्जासंस्थेशी क्लिष्टपणे जोडलेली असल्याने, ती काढून टाकल्याने नुकसान होण्याची शक्यता आहे या समजुतीतून निर्णय घेण्यात आला.
दक्षिण अमेरिकेतील गयाना येथे असाच प्रकार उघडकीस आला. मागील वर्षी जूनमध्ये शल्यचिकित्सकांनी 10 दिवसांच्या बाळाची शेपूट यशस्वीरित्या काढली. त्या उदाहरणात, बाळाचा जन्म एक असामान्य मणक्याने झाला होता, ज्यामुळे त्याला 'शेपटी' असते.