'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?

World News : जगाच्या पाठीवर असणाऱ्या अनेक देशांमध्ये काही अशा संकल्पना रुजल्या आहेत, ज्यांचं वास्तव भुवया उंचावून जातं. ही अशीच एक प्रथा...  

सायली पाटील | Updated: Nov 29, 2024, 02:32 PM IST
'देखणी बायको भाड्यानं देणं आहे'; कोणत्या देशात होतोय लग्नाचा विचित्र करार?  title=
(छाया सौजन्य- रॉयटर्स) / Beautiful rental wife is available shocking custom in thailand weird tradition world news

World News : बदलच्या काळानुसार विविध संस्कृती आणि देशांमध्ये विवाहसंस्थाही अतिशय झपाट्यानं बदलत गेल्याचं पाहायला मिळालं. पती पत्नीच्या नात्यांमध्ये कुठे करार झाले, कुठे व्यवहार झाले. त्यातच जगाच्या पाठीवर काही असेही देश समोर आले, जिथं चक्क काही तासांचं, काही दिवसांचं हे वैवाहिक नातं असल्याचंही पाहायला मिळालं. 

काही दिवसांपूर्वी इंडोनेशियातील 'प्लेजर मॅरेज' ही अशीच एक संकल्पना समोर आली होती. ज्यानंतर आता थायलंडमधील 'रेंटल वाईफ' ही संकल्पना अनेकांच्या भुवया उंचावत आहे. या देशात या महिलांना अर्थात भाडेतत्त्वावरील पत्नीला 'ब्लॅक पर्ल' म्हणूनही संबोधलं जात आहे. 

थायलंडमधील पटाया इथं ही वादग्रस्त प्रथा आजही सुरू असून, अनेकांकडून या संकल्पनेला आणि या संपूर्ण व्यवहाराला ‘Wife on Hire’ अशी ओळख मिळाली आहे. ही लग्नाची एक तात्पुरती सोय असून, यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला परदेशी पर्यटकांच्या पत्नी होण्यासाठी सहमती दर्शवतात. पटायाच्या 'रेड लाईट एरिया'पलिकडे आणि नाईटक्लबमध्ये हा प्रकार सर्वाधिक घडत असल्याचं पाहायला मिळतं असं सांगितलं जातं. 

थायलंडमध्ये अतिशय वेगानं हातपाय पसरणाऱ्या या अनपेक्षित क्षेत्रासंदर्भात एक पुस्तही छापण्यात आलं असून, La Vérité Emmanuel लिखीत या पुस्तकाचं नाव आहे  Thailand’s Taboo: The Rise of Wife Rental in Modern Society. सदर पुस्तकामध्ये या वादग्रस्त संकल्पनेशी प्रेम, अर्थकारण, वाद यांच्या नात्यावर उजेड टाकण्यात आला आहे. 

हेसुद्धा वाचा : भारताचं टेन्शन वाढलं, शत्रू राष्ट्राच्या हाती लागलं सोन्याचं घबाड 

वाईफ रेंटल ही संकल्पना इथं सध्या एका व्यावसायिक क्षेत्राच्या रुपात समोर आली आहे. इथं काही तरुणी या क्षेत्राकडे एक संधी म्हणून पाहत चांगली कमाई करतात असं स्थानिकांचं मत. या देशात महिला पर्यटकांसह त्यांच्या पत्नी म्हणून वावरतात आणि त्यांना तशा सुविधाही पुरवतात. लग्नाचा हा करार काही महिने किंवा काही दिवसांपुरताच मर्यादित असतो.