BMWचा अनोखा आविष्कार, कधी पाहिलीय रंग बदलणारी कार ?

आजवर तुम्ही वेगवेगळ्या कार पाहिल्या असतील. महागड्या गाड्य़ांबद्दल ऐकलंही असेल. पण कधी रंग बदलणारी कार पाहिलीय का? 

Updated: Jan 6, 2022, 10:41 PM IST
BMWचा अनोखा आविष्कार, कधी पाहिलीय रंग बदलणारी कार ? title=

मुंबई : आजवर तुम्ही वेगवेगळ्या कार पाहिल्या असतील. महागड्या गाड्य़ांबद्दल ऐकलंही असेल. पण कधी रंग बदलणारी कार पाहिलीय का? होय... तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत, रंग बदलणारी कार. BMWनं ही अनोखी कार तयार केलीय. पाहूयात कशी आहे ही अफलातून कार. (bmw showcases colour changing car at consumer electronics show)   

हा कोणताही चमत्कार नाही. तर हा आहे विज्ञानाचा आविष्कार आहे. कार घ्यायची म्हटली की बऱ्याचदा ती कोणत्या रंगाची घ्यावी असा विचार आपल्याला पडतो. कुणाला व्हाईट कार आवडते, तर कुणाला ग्रे. पण आता हे सगळे रंग तुम्हाला एकाच कारमध्ये पाहायला मिळू शकतात. पुन्हा एकदा पाहा ही कार कशी रंग बदलते ते.

नामांकित कार उत्पादक कंपनी BMWनं ही अनोखी रंगीत कार तयार केली आहे. अमेरिकेतल्या लास वेगास शहरात सध्या सर्वात मोठा इलेक्ट्रिक शो सुरू आहे. त्यात ही कार सर्वांचं लक्ष वेधून घेतेय. 

BMW कंपनीनं IX नावानं ही इलेक्ट्रीक कार तयार केलीय. तिची खासियत म्हणजे एक बटण दाबताच या कारचा रंग बदलतो. अगदी फोनच्या डिस्प्ले प्रमाणे ही कार रंग बदलते. तुर्तास कंपनीनं या कारच्या इतर फिचर्सची कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही कार नेमकी कशी आहे? तिची किंमत किती असेल हे जाणून घेण्यासाठी कारप्रेमींना आणखी काही काळ वाट पाहावी लागेल.