मोगादिशू : कारमध्ये ठेवलेल्या बॉम्बस्फोटाने संपूर्ण देश हादरला आहे. राजधानी मोगादिशूमध्ये दोन कार बॉम्ब स्फोटात किमान 100 लोक ठार झाले असून 300 जण जखमी झाले आहेत. अशी माहिती सोमालीयाचे अध्यक्ष हसन शेख मोहमुद यांनी दिली आहे. (Two car bomb explosions in Somalia’s capital Mogadishu)
भरचौकाच्या शेजारी असलेल्या सोमालियाच्या शिक्षण मंत्रालयात झालेल्या दोन कार बॉम्ब स्फोटात मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. या हल्ल्याची जबाबदारी अजून तरी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतलेली नाही. जगभरातून या हल्ल्याचा निषेध होत असून दहशतवाद मोडून काढण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं जात आहे.
पहिला स्फोट दुपारी 2 वाजताच्या सुमारास शिक्षण मंत्रालयात झाला. रुग्णवाहिका आल्या आणि पीडितांना मदत करण्याचं काम लोकांकडून होत असतानाच दुसरा स्फोट झाला. त्यामुळे मृत्यांची संख्या आणखी वाढली.