County Announces Cash Reward For Couples: प्रत्येक देशांकडून त्यांच्या नागरिकांसाठी वेगळे कायदे व नियम असतात. काही देश वाढत्या लोकसंख्येमुळं चिंतेत आहेत तर काही देशांमध्ये कमी होत जाणाऱ्या लोकसंख्येमुळं देश टेन्शनमध्ये आहेत. या देशांत भविष्यात निर्माण होणाऱ्या चिंताजनक परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी आत्तापासूनच उपाय सुरू केले आहेत. चीनमध्ये देखील सरकारने ठोस पावलं उचलली आहेत. चीनमध्ये घटत्या जन्मदरामुळं सरकार युवकांना लग्न करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत. यासाठी तरुणांसमोर अनेक ऑफर्सदेखील ठेवल्या आहेत.
चीन सरकारने तरुणींनी लग्नाचा निर्णय घ्यावा यासाठी त्यांच्यासमोर अनेक ऑफर्स ठेवल्या आहेत. चीनमधील चांगशान काउंटीमध्ये जोडप्याना लग्न करण्यासाठी जवळपास 1000 युआन (11,520) रुपये देणार आहे. मात्र, त्याचवेळी त्यांच्यासमोर एक अटदेखील ठेवली आहे. लग्न करताना तरुणीचे वय हे 25 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी असावे. तसंच, ज्या जोडप्यांचे हे पहिले लग्न असेल त्यांनाच ही रोख रक्कम दिली जाईल. जेणेकरुन योग्य वयात लग्न आणि मुलांचा जन्म होईल. सरकारकडून मुलांची देखभाल करण्यासाठी व शिक्षणासाठी सबसिडीदेखील देण्यात येईल.
चीनमध्ये लग्न करण्याचा दरात घट होऊन 2022च्या तुलनेत 6.8 मिलियन पर्यंत पोहोचला आहे. 1986नंतर हा सर्वात कमी दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा आकडा 80,000 हून कमी आहे, असे समोर आले आहे.
चीनमध्ये लग्न करण्याचा प्रमाण घटतेय. तरुणा लग्न न करण्याचा निर्णय घेत आहेत. त्याच कारणामुळं जन्मदर देखील घटतोय. यामागे कारण आहे की सिंगल मदर एकटी आपल्या मुलांचा सांभाळ करु शकत नाही. आईला एकटीला मुलांचा सांभाळ करणे शक्य होत नाही. त्यामुळं सरकारने राबवलेल्या घोषणांमुळं चीनच्या लोकसंख्येवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारच्या घोषणा तरुणांसाठी फायदेशीर ठरू शकतात.
एका सरकारी अहवालात व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजानुसार, चीनचा प्रजनन दर हा जगातील सगळ्यात कमी प्रजनन दर आहे. 2022मध्ये यात आणखी घट होऊन 1.09 रेकॉर्डपेक्षा घटला आहे. करिअरवर परिणाम होण्याच्या भितीने किंवा वाढत्या महागाईच्या कारणांमुळं महिला मुलं न होण्याचा निर्णय घेत आहे. या मुळं चीनच्या लोकसंख्येवर मोठा परिणाम होत आहे.