Crime News : अमेरिकत (Crime News) एका भारतीय वंशाच्या व्यक्तीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अनुराग चंद्रा (Anurag Chandra) नावाच्या व्यक्तीला अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये त्याच्या घराची बेल वाजवून (doorbell) टिंगल करणाऱ्या तीन किशोरवयीन मुलांची हत्या केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. अनुराग चंद्राला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याने जाणूनबुजून आपल्या एका कारला धडक दिली होती, त्यात तीन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला होता. तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. 2020 मध्ये घडलेल्या घटनेप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते.
कॅलिफोर्निया येथील रहिवासी असलेल्या अनुराग चंद्रा (45) याला एप्रिलमध्ये तीन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये, हत्येचा प्रयत्न केल्याच्या तीन गुन्ह्यांमध्ये आणि खुनाच्या विशेष गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले होते. जिल्हा कार्यालयाकडून 14 जुलै रोजी प्रसिद्ध झालेल्या पत्रकात यासंदर्भात माहिती देण्यात आली होती. रिव्हरसाइड काउंटीमधील न्यायाधिशांना दोषीचा निकाल देण्यासाठी तीन तास लागले, असे या पत्रकात म्हटलं होतं.
ही घटना 19 जानेवारी 2020 रोजी घडली होती जेव्हा मुलांना चंद्राच्या घराची बेल वाजवली आणि टिंगल सुरु केली. चंद्राने सांगितले की, बेल वाजवून पळून जाण्यापूर्वी एका मुलाने मला चिडवले होते. त्यामुळे कारने तिन्ही तरुणांना चिरडून ठार केले. चंद्रा म्हणाला की त्या दिवशी मी 12 बाटल्या बिअर प्यायलो होतो. त्यामुळे खूप नशेत होतो. मुलांच्या खोडसाळपणाने मी हैराण झाला होतो आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेची काळजी करत होतो. मी त्या मुलांचा पाठलाग केला आणि त्यांच्या टोयोटाला रस्त्यावर धडक दिली. तीन मुलांसह टोयोटा एका झाडावर आदळली. चंद्रा म्हणाला की, धडकेनंतर मी आपले वाहन थांबवले नाही कारण कोणी जखमी झाले असेल मला त्याला वाटले नव्हते. दरम्यान, 2020 मध्ये झालेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेप्रकरणी चंद्रा याच्यावर आधीच आरोप होता.
"धडक होण्यापूर्वी मी 159 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवत होतो. माझा उद्देश त्यांना मारण्याचा नव्हता तर त्यांना धडा शिकवायचा होता. दारावरची बेल वाजवणाऱ्यांचा मला प्रचंड राग आला होता. यामुळे मी मुलांचा पाठलाग केला मात्र गाडीचे ब्रेक वेळेत लावता न आल्याने हा अपघात झाला," असे अनुराग चंद्राने सांगितले.
दरम्यान, कोर्टात खटल्याच्या सुनावणीदरम्यान, रिव्हरसाइड काउंटी जिल्हा न्यायाधिश माइक हेस्ट्रिन म्हणाले की, "या तरुणांची हत्या ही आपल्या समुदायासाठी एक भयानक आणि संवेदनाहीन शोकांतिका आहे. असा वेडेपणा सहन केला जाणार नाही. ही पूर्वनियोजित हत्या आहे." त्यानंतर आता न्यायालयाने चंद्रावर आरोप निश्चित करत त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.