China Tiangong Space Station: मागील आठवड्यात अंतराळात रशियन सॅटेलाईटचा स्फोट झाला यामुळे एकच खळबळ उडाली. नासाचे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन थोडक्यात बचावले. रशियन सॅटेलाईटचा स्फोट होताच चीनने खबरदारी घेत आपल्या स्पेस स्टेशनच्या सुरक्षेसाठा तात्काळ उपाययोजना केली आहे. चीनने अवघ्या सहा तासांत आपल्या स्पेस स्टेशनभोवती सुरक्षा कवच उभारले आहे. यासाठी स्पेस स्टेशनवर कार्यरत असलेल्या चीनच्या अंतराळवीरांनी सहा तासांचा स्पेस वॉक करत नवा विक्रम देखील रचला आहे.
26 जून रोजी RESURS-P1 या रशियन उपग्रहाचा स्फोट झाला. 2022 मध्येच हा उपग्रह निकामी असल्याचं घोषित करण्यात आला होता. या उपग्रहाचा भयंकर स्फोट होऊन तो क्षणात उध्वस्त झाला. हा स्फोट इतका भयंकर होता, की उपग्रहाचे 100 पेक्षा अदिक तुकडे झाले. जिथं स्फोट झाला ती जागा International Space Station पासून अगदी जवळ होती. यामुळं स्पेस स्टेशनला धोका निर्माण झाला. सुरक्षेच्या कारणास्तव अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवरील सेफ हाऊसमध्ये मूव्ह होण्यास सांगण्यात आले. या दुर्घटनेचे बोध घेत चीने तात्काळ आपल्या स्पेस स्टेशन भोवती सुरक्षा कवच बांधले आहे.
चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन आहे. ‘तियांगॉन्ग’ असे या स्पेस स्टेशनचे (Tiangong space station China) नाव आहे. NASA चे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (International Space Station) 15 देशांच्या सहकर्याने तयार करण्यात आले आहे. तर, चीनने आपले स्वत:चे स्पेस स्टेशन आहे. हे स्पेश स्टेशन उभारण्यासाठी चीनला 3 दशकांचा वेळ लागला. हे अंतराळ स्थानक 180 फूट (55 मीटर) उंच आहे. यात तीन मॉड्यूल्स आहेत जे स्वतंत्रपणे लाँच केल्यानंतर अवकाशात जोडले गेले.
चीनच्या शेनझोऊ 18 मिशनच्या दोन अंतराळवीरांनी सहा तासांचा खास स्पेस वॉक केला. या दरम्यान अंतराळवीरांनी ‘तियांगॉन्ग’ स्पेस स्टेशनभोवती चहुबाजूने शील्ड अर्थात सुरक्षा कवच उभारले आहे. या शील्डमुळे ‘तियांगॉन्ग’ स्पेस स्टेशनचे संरक्षण होणार आहे. कोणत्या प्रकारचा स्पेस कचरा स्पेस स्टेशनला धडकला तरी नुकसान होणार नाही. उपग्रहाचा स्फोट झाल्याने संपूर्ण जग चिंतेत असताना चीनने मात्र, क्षणाचाही विलंब न करता तात्काळ उपाययोजना केली आहे. शिल्ड बसवण्यासाठी घेण्यात आलेला सहा तासांचा स्पेस वॉक हा चीनने रचलेला इतिहास आहे.
यापूर्वी चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये आंतराळवीरांनी अंचबित करणारा प्रयोग केला होता. चीनच्या शेनझोऊ 16 अंतराळवीरांनी तियांगॉन्ग स्पेस स्टेशनमध्ये मेणबत्ती पेटवली होती. एका प्रयोगाचा भाग म्हणून ही मेणबत्ती पेटवण्यात आली होती. या प्रयोगाचे लाईव्ह टेलिकास्ट देखील करण्यात आले होते. 21 सप्टेंबर 2023 रोजी चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवरून थेट प्रक्षेपण करताना अंतराळवीर गुई हाईचाओ आणि झू यांगझोऊ एक मेणबत्ती पेटवली. तियांगॉन्ग स्पेसशनवरुन ऑनलाईन लेक्चर घेतले जाते. याला 'तियांगॉन्ग क्लासरूम' असे म्हंटले जाते. यावेळी एक प्रयोग दाखवताना ही मेणबत्ती पेटवण्यात आली.
स्पेस स्टेशनवर कोणत्याही प्रकारचे वातावरण नसते यामुळे येथे पाणी देखील गोठलेल्या स्वरुपात दिसते. अशातच आगीच्या ज्वाळांचे निरीक्षण करण्यासाठी हा मेणबत्ती पेटवण्याचा प्रयोग करण्यात आला. सूक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये आगीच्या ज्वाळा कशा प्रकारे काम करतात याचे निरीक्षण करणे हे या प्रयोगामागचे मुख्य उद्दीष्ट आहे. पृथ्वीवर मेणबत्ती पेटवल्यास त्यापासून ज्वाळा तयार होतात. मात्र, चीनच्या स्पेस स्टेशनमध्ये पेटवण्यात आलेल्या मेणबत्तीच्या ज्वाळा या पृथ्वीच्या निम्न कक्षाच्या सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणात गोल आकारात परावर्तित झाल्याचे व्हिडिओत दिसत आहे. मेणबत्तीच्या ज्वाळा अजिबात पसरत नसल्याचे दिसत आहे.