वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची व्हाईट हाऊसमध्ये स्वागत केलं. त्यानंतर व्हाईट हाऊसमध्ये पंतप्रधान मोदींसाठी खास डिनरचं आयोजन करण्यात आलं होतं.
पंतप्रधान मोदी हे वर्षाच्या सुरुवातीलाच अमेरिका दौऱ्यावर येणार होते. पण उत्तर प्रदेश निवडणुकीमुळे त्यांचा या दौरा लांबला. याचा उल्लेख स्वत: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
व्हाईट हाऊसच्या ऐतिहासिक ब्लू रुममध्ये डिनर करतांना ट्रंप यांनी या गोष्टीचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की, 'तुम्हाला माहिती आहे की,'पंतप्रधान मोदी आधीच अमेरिका दौऱ्यावर येणार होते पण तेव्हा भारतात काही राज्यांमध्ये निवडणुका होत्या.' या दरम्यान त्यांनी युपीमध्ये विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचं अभिनंदन देखील केलं.
ट्रंप यांनी म्हटलं की, 'आम्हाला माहित आहे की भारत हा जगातला सातवा सर्वात मोठा देश आहे. आजचा दिवस खूप खास आहे. पंतप्रधान मोदींचं येथे येणं खास आहे.'
यूपीमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला होता. त्यामध्ये ४०३ पैकी ३०० जागांवर भाजपने विजय मिळवला होता. ट्रंपने याबाबत मोदींचं अभिनंदन केलं आणि म्हटलं की हा महान विजय होता.