अमेरिकेत टाईम स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट

अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 11, 2017, 07:49 PM IST
अमेरिकेत टाईम स्क्वेअरजवळ शक्तीशाली स्फोट title=

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये एक शक्तीशाली स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे.

हा स्फोट ज्या ठिकाणी झाला आहे त्याचं सीसीटीव्ही फुटेज ट्विटरवर अपलोड करण्यात आलं आहे. 

हा स्फोट टाईम स्क्वेअरजवळ झाल्याचं कळतयं. या स्फोटाला न्यूयॉर्क पोलिसांनी दुजोरा दिला आहे.

या स्फोटानंतर एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं असून अधिक तपास सुरु आहे.

या शक्तीशाली स्फोटानंतर जवळच असणारे सबवे ट्रेन लाईन्स स्टेशन रिकामे करण्यात आले आहेत. मात्र, या स्फोटामागचं नेमकं कारणं अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं. नाहीये.