ग्रीनपीसच्या विमानाला अपघात...

ब्राझीलमधील अमेजन येथे ग्रीनप्रीसच्या एका छोट्या विमानाला अपघात झाला.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 18, 2017, 06:59 PM IST
ग्रीनपीसच्या विमानाला अपघात...  title=

साओ पाउलो : ब्राझीलमधील अमेजन येथे ग्रीनप्रीसच्या एका छोट्या विमानाला अपघात झाला. यात एका महिलेचा मृत्यू झाला. या विमानातून ५ प्रवासी प्रवास करत होते. पर्यावरण समूह ग्रीनपीस यांनी सांगितले की, एक इंजिन असलेल्या या विमानाला अमेजनची राजधानी मानउस जवळ अपघात झाला. या दुर्घटनेत पायलट आणि ३ कर्मचारी बचावले. 

ही मृत महिला २९ वर्षांची असून तिची ओळख कुटुंबियांना पटली आहे. ती स्वीडन येथे राहणारी होती.