Hotel of Doom Ryugyong Hotel: उत्तर कोरियात असं एक हॉटेल शापित हॉटेल आहे. जिथे आजपर्यंत एकही ग्राहक येऊ शकलेला नाहीये. हे हॉटेल बांधण्यासाठी हजारो कोटींचा खर्च करण्यात आला मात्र, इतका खर्च करुनही या हॉटेलचे उद्धाटन होऊ शकले नाहीये. हे हॉटेल बांधून इनेक दशके उलटून गेली मात्र ना हॉटेलचे उद्घाटन होऊ शकले ना त्या हॉटेलमध्ये आत्तापर्यंत एकही ग्राहक येऊ शकला नाही. आता हे हॉटेल शापित हॉटेल म्हणून ओळखले जाते. तर, जाहीरातींच्या शूटिंगसाठी या हॉटेलचा वापर केला जातो. या हॉटेलचे नाव Ryugyong हॉटेल असं आहे.
द सनच्या वृत्तानुसार, 1987 मध्ये उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगमध्ये एका भव्य नवीन हॉटेलची पायाभरणी करण्यात आली होती. पिरॅमिडच्या आकाराची, गगनचुंबी इमारत 1000 फुटांपेक्षा जास्त उंच होती. या हॉटेलमध्ये किमान 3000 खोल्या तसेच विहंगम दृश्यांसह पाच फिरणारी रेस्टॉरंट्स अशा पद्धतीने हे हॉटेल डिझाइन केले होते. देशाची आर्थिक आणि राजकीय ताकद दाखवणे हा हॉटेल बांधण्यामागचा उद्देश होता.
हॉटेल बांधून 35 वर्षांपेक्षा जास्त काळ उलटून गेला मात्र अद्यापही या हॉटेलमध्ये एकही ग्राहक आला नाहीये. एका वृत्तानुसार, उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांचा जन्म 8 जानेवारी 1984 साली झाला होता. तेव्हा या हॉटेलचे बांधकाम करण्यात येत होते. आज किम जोंग हे 39 वर्षांचे आहेत, तरीदेखील हे हॉटेल अद्याप ग्राहकांसाठी सुरू करण्यात आले नाहीये.
दरम्यान, या इमारतीला आता हॉटेल ऑफ डूम असं टोपणनाव देण्यात आले आहे. म्हणजेच असे शापित हॉटेल जिथे आजपर्यंत एकही ग्राहक आला नाहीये. किम जोंग उनच्या राजवाड्यापासून या हॉटेलचे अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे. किम जोंग उन यांना त्यांच्या ताफ्यासह येथून पोहोचण्यास वीस मिनिटांचा वेळही लागणार नाही. या हॉटेलचे बांधकाम 1992 मध्ये थांबले होते, कारण सोव्हिएत युनियनच्या पतनानंतर उत्तर कोरियाला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला होता. जर या हॉटेलचे बांधकाम वेळेवर पूर्ण झाले असते तर ते त्यावेळचे जगातील सर्वात उंच हॉटेल ठरले असते. पण दुर्दैवाने या हॉटेलवर आता जगातील सर्वात उंच रिकामी इमारत होण्याचा विक्रम आहे. या हॉटेलच्या उभारणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत.
आजच्या काळात या हॉटेलची रचना गंजल्यामुळे कमकुवत झाल्याचे बोलले जाते. या हॉटेलमध्ये 2018 मध्ये मोठे एलईडी पॅनल्स बसवण्यात आले होते. त्यानंतर उत्तर कोरियाच्या सरकारच्या प्रचार यंत्रणा आणि किम जोंग उन यांच्या वैयक्तिक प्रचारासाठी याचा वापर केला जातो.