OSIRIS-REx, Bennu Asteroid: पृथ्वीचा जन्म कसा झाला? याचे रहस्य लवकरच उलगडणार आहे. हे शक्य होणार आहे ते नासाने अवकाशातून आणलेला बेन्नू (bennu asteroid) लघुग्रहाच्या तुकड्यामुळे. OSIRIS-REx अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत आणलेल्या Bennu लघुग्रहाच्या तुकड्याचे संशोधन सुरु आहे. नासाना महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे.
24 सप्टेंबर रोजी बेन्नू लघुग्रहावरील दगड आणि धुळीचे नमुने पृथ्वीवर आणण्यात नासाला यश मिळालंय. नासाच्या ऑसिरिस-रेक्स अवकाशयानातून पृथ्वीच्या कक्षेत 63 हजार मैलांवर हे नमुने आणण्यात आले. बेन्नू लघुग्रहाचे नमुने घेऊन आलेल्या OSIRIS-REx हे अवकाशयान कॅप्सूल पॅराशूटद्वारे लष्कराच्या उटाह येथील वाळवंटात उतरवण्यात आले. OSIRIS-REx हे अवकाशयान हायपरसोनिक वेगाने प्रवास करत पृथ्वीच्या दिशेने आले. पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना त्याचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा 36 पट जास्त होता. लँडिंगवेळी याचा वेग ताशी 10 मैल होता. म्हणजेच ताशी 16 किलोमीटर वेगाने पॅराशूटद्वारे हे कॅप्सुल पृथ्वीवर लँड करण्यात आले. ही कॅप्सूल लहान फ्रीजच्या आकाराची आहे. यानंतर Bennu लघुग्रहाचे सॅम्पल प्रयोगशाळेत संशोधनासाठी नेण्यात आले आहेत. 45 किलो कॅप्सूलमध्ये सुमारे 250 ग्रॅम नमुना आहे.
पृथ्वीसाठी धोकादायक ठरु शकतात अशा लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी नासाचे हे पहिलेच मिशन आहे. याला OSIRIS-REx मिशन असे नाव देण्यात आले आहे. बेन्नू लघुग्रहाचा अभ्यास करण्यासाठी सात वर्षांपूर्वी मिशन लाँच करण्यात आले होते. तीन वर्षांपूर्वी Bennu लघुग्रहा नमुने गोळा केले होते. तेव्हापासून हे कॅप्सुल पृथ्वीच्या दिशेने परतत होते.
ह्यूस्टनमधील नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरमध्ये Bennu लघुग्रहाच्या तुकड्यावर संशोधन सुरु आहे. Bennu लघुग्रहाच्या तुकड्यामुळे जीवसृष्टीचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. या लघुग्रहाच्या संशोधनामुळे 4.5 अब्ज वर्षांपूर्वी आपल्या सौरमालेच्या सुरुवातीस पृथ्वी आणि जीवन कसे अस्तित्वात आले याबाबतचे रहस्य उलगडण्यास मदत होणार आहे. तसेच ग्रहाची निर्मिती कशा प्रकारे होते. सेंद्रिय पदार्थ आणि पाण्याची उत्पत्ती कशी झाली याबाबत देखील माहिती मिळू शकते.
Bennu लघुग्रह 159 वर्षांनी म्हणजे 24 सप्टेंबर 2182 रोजी पृथ्वीवर आदळू शकतो. Bennu लघुग्रह पृथ्वीवर धडकला तर प्रचंड विध्वंस होईल. जमिनीवर आदळला तर जीवसृष्टीचा नाश होईल. समुद्रात कोसळला तर, त्सुनामी येईल. Bennu लघुग्रह पृथ्वीसाठी धोकायक ठरू शकतो. धोका टाळण्यासाठी NASA यावर संशोधन करत आहे.