नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील चर्चेची दहावी फेरी आज होणार आहे. कोर कमांडर स्तरावरील चर्चेत ही फेरी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या बाजूच्या मोल्दो येते होणार आहे. पँगॉन्ग त्सो भागातील सैन्य माघारी घेतल्यानंतर उर्वरीत वादग्रस्त भागातील सैन्य माघारी घेण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
सीमेवरील सैन्य हटवण्याबाबत भारत चीन दरम्यान चर्चेची आज दहावी फेरी होणार आहे. पेंगोंग सरोवर भागातील सैन्य हटवल्यानंतर आता दुस-या भागातील सैन्य हटवण्याबाबत चर्चा होणार आहे. भारतीय प्रतिनिधीमंडळाचे नेतृत्व लेफ्टनेंट जनरल पीजीके मेनन करणार आहेत. जे लेहमधील 14 वे कोरचे कमांडर आहेत. चीनी पक्षाचे नेतृत्व मेजर जनरल लिउ लिन करणार आहे. चीन सेनेचे दक्षिणी शिनजियांग सैन्य जिल्ह्याचे ते कमांडर आहेत.
भारत आणि चीनमध्ये गेल्या 9 महिन्यांपासून सैन्यांमध्ये धुसमुस सुरू आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी 11 फेब्रुवारी रोजी संसदेत एक वक्तव्य केलं होतं. भारत आणि चीनमध्ये पैंगोंग भागातून सैनिकांना हटवण्याबाबात करार झाला आहे. चीन आपल्या सैनिकांची तुकडी पैंगोंग भागातून फिंगर आठ क्षेत्रात हटवण्यात आली आहे.
या आठवड्याच्या अखेरीस पूर्व लडाखमध्ये चीन सैन्य (China Army) पँगाँग भागातून संपूर्णतः माघार घेणार आहे. त्यानंतर गोग्रा, हॉटस्प्रिंग, देपसांग या भागातून चीनही माघार सुरू होणार आहे. या तीन भागात कशापद्धतीने माघार होईल याचा प्लॅन भारत चीन लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत निश्चित होईल. चीनने आत्तापर्यंत या भागातून दीडशे रणगाडे आणि 5000 हून अधिक सैनिक मागे घेतले आहेत.
चिनी सैनिकांनी माघार घेत फिंगर 8 च्या पूर्व भागात जाणार आहेत. चिनी सैनिकांनी माघार घेताना उभारलेले तंबूही तोडलेत. भारतीय फौजा फिंगर 3 या आपल्या बेस कँपवर कायम राहणार आहेत. दरम्यान फिंगर 4 ते फिंगर 8 दरम्यान पेट्रोलिंग होणार नाही असं ठरलं आहे.