Sargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा किताब

Sargam Koushal Mrs World 2022 :  भारताच्या खिशात तब्बल 21 वर्षानंतर मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट आला आहे. या तिच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.  

Updated: Dec 18, 2022, 08:44 PM IST
Sargam Koushal : भारताच्या सरगम कौशलने जिंकला मिसेस वर्ल्डचा किताब  title=

Sargam Koushal Mrs World 2022 : भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022) किताब जिंकला आहे. सरगमने (Sargam Koushal) मिसेस पॉलिनेशियाला (mrs polynesia) हरवून या किताबावर नाव कोरले आहे. यामुळे भारताच्या खिशात तब्बल 21 वर्षानंतर मिसेस वर्ल्ड 2022 चा मुकुट आला आहे. या तिच्या कामगिरीमुळे भारताची मान अभिमानाने उंचावली आहे.  

अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत भारताच्या सरगम कौशलने मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022) किताब जिंकून इतिहास रचला आहे. सरगम कौशलने मिसेस पॉलिनेशियाला हरवून मिसेस वर्ल्ड 2022 चे विजेतेपद पटकावले आहे. सरगमने 21 वर्षांनंतर हा मुकुट भारतात आणला आहे. त्यामुळे सरगमवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

सरगम कौशलच्या (Sargam Koushal) विजयानंतर मिसेस इंडिया स्पर्धेच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तसेच या पोस्टवर, "दीर्घ प्रतीक्षा संपली आहे, 21 वर्षांनंतर आम्हाला मुकुट परत मिळाला आहे!", असे कॅप्शन लिहण्यात आले होते. 

कोण आहे सरगम कौशल? 

अमेरीकेत मिसेस वर्ल्ड 2022 चा (Mrs World 2022)  किताब जिंकणारी सरगम कौशल (Sargam Koushal) देशात मुळची जम्मू-काश्मीरची आहेत. ती विझागमध्ये शिक्षिका म्हणून काम करत होती. तसेच तिचे पती भारतीय नौदलात काम करतात. कौशलने ग्रँड फिनालेसाठी एक आकर्षक गुलाबी रंगाचा  स्लीव्हलेस गाऊन परिधान केला होता. हा गाऊन भावना राव यांनी डिझाईन केला होता.  मिसेस इंडिया पेजने सरगम कौशलचा (Sargam Koushal)  अमूल्य विजय आणि मुकुटची पोस्ट शेअर केली आहे.

दरम्यान याआधी भारताने 2001 साली मिसेस वर्ल्ड किताब जिंकला होता. डॉ. अदिती गोवित्रीकरने मिसेस वर्ल्डचा मुकुट घातला होता. त्यानंतर आता 21 वर्षानंतर भारताने सरगम कौशल (Sargam Koushal) मदतीने मिसेस वर्ल्ड किताब पटकावला आहे. सरगम कौशलच्या या कामगिरीनंतर संपुर्ण देशभरातून तिचे कौतूक होत आहे.