नवी दिल्ली : जपानी वंशाचे ब्रिटिश कादंबरीकार काझुओ इशिगुरो यांना यंदाचा साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार जाहीर झालाय.
नागासाकीमध्ये जन्म झालेल्या इशिगुरो यांच्या आई-वडिलांनी ते पाच वर्षांचे असताना ब्रिटनला स्थलांतर केलं. त्यानंतर अनेक वर्षांनी जपानमध्ये गेलेल्या इशिगुरो यांनी 'ए पेल व्ह्यू ऑफ हिल्स' आणि 'अॅन आर्टिस्ट ऑफ द फ्लोटिंग वर्ल्ड' या नागासाकीमध्ये आणि दुसऱ्या महायुद्धाचं कथानक असलेल्या कादंबऱ्या लिहिल्या.
त्यानंतर १९८९ मध्ये इशिगुरो यांच्या 'दी रिमेन्स ऑफ द डे' या कादंबरीला प्रतिष्ठेचा 'मॅन बुकर' पुरस्कार मिळाला. या कादंबरीवर नंतर चित्रपटही तयार झाला होता.