मुंबई : चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने (Corona virus) हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये मोठ्या प्रमाणात फैलाव झालेल्या कोरोना व्हायरसचे पडसाद आता संपूर्ण जगात पसरले आहे. त्यामुळे जगातील सर्वसामान्य व्यक्तींपासून ते दिग्गज व्यक्तींदेखील कोरोना व्हायरस विषयी भीती वाटू लागली आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong) हे देखील चिंतेत आहे.
किम यांनी धमकी दिली आहे की जर कोरोना व्हायरसने उत्तर कोरियामध्ये (South Korea) शिरकाव केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. त्यामुळे त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सक्त पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत ३२०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे किम जोंग यांनी अधिकाऱ्यांची बैढक बोलावली होती. जर उत्तर कोरियामध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव झाला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असे ते म्हणाले.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळे उत्तर कोरियाने त्यांच्या सर्व सीमा सील केल्या आहेत. त्याचप्रमाणे पर्यटकांच्या प्रवेशावर देखील बंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात येत आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्तर कोरियामध्ये आतापर्यंत एकही कोरोनाचा रूग्ण अढळून आलेला नाही. परंतु दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात आहे. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया आणि चीन हे शेजारी राष्ट्र आहेत.
भारताच्या आरोग्य मंत्रालयाने इटली, ईराण, साऊथ कोरिआ, आणि जपानहून येणाऱ्या प्रवशांचा व्हिजा रद्द केलाय. ३ मार्चनंतर या देशांमधून येणाऱ्या नागरिकांना भारताचा व्हिजा नाकारण्यात आलाय. कोरोना व्हायरसमुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.