दरवर्षी २०० कोटी रुपयांची दारु पितो किम जोंग उन, इतकी आहे संपत्ती

अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील नाते एका महत्त्वाच्या वळणावर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन लवकरच भेटणार आहे. किम जोंगने स्वत: ही गोष्ट मान्य केलीये की तो अमेरिकेशी बातचीत करण्यास तयार आहे. ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीपूर्वी व्हाईट हाऊसने एक अट ठेवली होती. उत्तर कोरियाने आपले मिसाईल तसेच आण्विक कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात यावेत. किम जोंग तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहे. 

Updated: Mar 29, 2018, 11:08 AM IST
दरवर्षी २०० कोटी रुपयांची दारु पितो किम जोंग उन, इतकी आहे संपत्ती title=
प्योनगँग : अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील नाते एका महत्त्वाच्या वळणावर आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग ऊन लवकरच भेटणार आहे. किम जोंगने स्वत: ही गोष्ट मान्य केलीये की तो अमेरिकेशी बातचीत करण्यास तयार आहे. ट्रम्प आणि किम जोंग यांच्या भेटीपूर्वी व्हाईट हाऊसने एक अट ठेवली होती. उत्तर कोरियाने आपले मिसाईल तसेच आण्विक कार्यक्रमांवर प्रतिबंध लावण्यात यावेत. किम जोंग तीन दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहे. 
 

२०० कोटी रुपयांची दारु पितो किम

 
उत्तर कोरियाचा हुकूमशहा तानाशाह किम जोंग जितका त्याच्या क्रूरपणासाठी प्रसिद्ध आहे तितकाच त्याच्या रहस्यमयी जीवनासाठी प्रसिद्ध आहे. ऐशो आरामात जगणे, स्वत:ची मनमानी करणे अशा त्याच्या सवयी आहेत. तो वर्षभरात २०० कोटी रुपयांची दारु पितो. 
 

सिगारेटच्या एका पॅकेटची किंमत १० हजार रुपये

किमला फ्रेंच डिझायनर सिगारेट पसंत आहे. इंग्रजी वेबसाईटच्या न्यूजनुसार त्याचा फेव्हरेट ब्राँड Yves Saint Laurent variety. याच्या एका पाकिटाची किंमत ४४ डॉलर (३ हजार रुपये)
तर खास लेदर पॅकची किंमत १६५ डॉलर(१० हजार रुपये) आहे. 
 

एका बॉटलची किंमत १.४१ लाख रुपये

रिपोर्टनुसार, किम जोंग ऊन आणि त्याच्या सर्कलमधील लोकांसाठी दरवर्षी २०० कोटी रुपयांची दारु मागवली जाते. यात व्हिस्की आणि कोईनेक ही दारु प्रामुख्याने प्यायली जाते. मीडिया रिपोर्टनुसार, किमला हेन्सी सारखा ब्रँड आवडतो. याच्या एका बाटलीची किंमत २,१४५ डॉलर(१.४१ लाख रुपये) आहे. 
 

किती आहे किम जोंगची संपत्ती

हाफिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, किम जोंग उनची साधारण ५ अब्ज डॉलर(३२.५ हजार कोटी) संपत्ती आहे. यूएनच्या रिपोर्टनुसार ही संपत्ती गरिबांवर खर्च केली जात नाही. अधिकतर पैसा हा ऐशो आरामासाठी खर्च केला जातो. यातील ६० कोटी डॉलर(४ हजार कोटी रुपये) दरवर्षी किमवर खर्च केला जातो.