न्यूयॉर्क : भारताने पाकिस्तानला चांगलेच सुनावले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये बोलताना परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला घरले. दहशतवादाचा राक्षस जगाच्या प्रत्येक देशापर्यंत पोहोचलाय. भारत कित्येक वर्षांपासून दहशतवादाची झळ सोसतोय. पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना खतपाणी घातले जात आहे. त्यासाठी दशतवाद्यांचा गौरवही पाकिस्तानकडून करण्यात येतो, असा हल्लाबोल स्वराज यांनी केला. त्याचवेळी पाकिस्तानचे आरोप फेटाळून लावले.
Today I again appeal to you from this platform that after reaching a consensus on the definition of terrorism, we pass CCIT (Comprehensive Convention on International Terrorism) as soon as possible: EAM Sushma Swaraj at #UNGA pic.twitter.com/3XbnTzvYuu
— ANI (@ANI) September 29, 2018
दरम्यान, दहशतवादाचे हे आव्हान हे शेजारी देशामुळे निर्माण झाले आहे. हा देश दहशतवाद पसरवण्यातच नव्हे तर दहशतवादाचे आरोप फेटाळून लावण्यातही हा देश माहीर आहे, अशी टीका स्वराज यांनी केली. अमेरिकेवर ९/११ हल्ला करणारा ओसामा बिन लादेन अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता. अमेरिकेने आपल्या सैन्य क्षमतेच्या बळावर पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले पण हे सत्य समोर आल्यानंतर आपण काही गुन्हा केलाय, असे पाकिस्तानला वाटत नव्हते. अजूनही तसेच सुरु आहे, असे त्या म्हणाल्या.
९/११चा मास्टर माईड मारला गेला. मात्र, मुंबईत २६/११ चा हल्ला घडवणारा हाफिज सईद पाकिस्तानात उथळ माथ्याने फिरतोय. तो तिथे सभा, मोर्चे काढून भारताला धमकी देतोय. या सगळयामध्ये चांगली बाब म्हणजे पाकिस्तानचा खरा चेहरा आता जगासमोर आले आहे, असे स्वराज म्हणाल्या.
कुठलाही जटील प्रश्न, वाद चर्चेने सुटतो यावर आमचा विश्वास आहे. अनेकदा पाकिस्तान बरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न केला पण ही चर्चा रद्द झाली असेल तर त्याला पाकिस्तानचे वर्तन जबाबदार आहे, असे स्वराज म्हणाल्या. मागच्यावर्षी संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानने भारताकडून मानवी अधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा एक फोटो दाखवला होता. पण हा फोटो दुसऱ्याच कुठल्यातरी देशातील होता. याची आठवण करुन दिली. त्यामुळे खोटे कोण बोलते ते जगाला माहित, असे स्वराज म्हणाल्या.