Microsoft Layoffs: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे नोकरकपातीची. त्यामुळे नोकरी करणाऱ्यांवर आता टांगती तलवार लागल्यासारखे झाले आहे. परंतु त्यातूनही आता सर्वात मोठी चर्चा सुरू झालीये ते मायक्रोसॉफ्टनं केलेल्या नोकरकपातीबद्दल. जगातल्या या नामवंत कंपनीनं एकूण 10,000 हजार लोकांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. त्यामुळे सध्या या कंपनीतले कर्मचारी खूपच तणावात आहेत. या कंपनीतून काढण्यात आलेल्या एका भारतीय व्यक्तीची पोस्ट सगळीकडेच व्हायरल होते आहे. प्रशांत कमानी यांनी गेली 21 वर्षे मायक्रोसॉफ्टमध्ये काम केले असून त्यांना या ले ऑफच्या प्रक्रियेतून काढून टाकण्यात आलेले आहे परंतु गेली एकवीस वर्षे राबल्यानंतर अचानक काढून टाकल्यानं मात्र कमानी यांनी लिंक्डीनवरून एक भावनिक पोस्टीही शेअर केली आहे.
प्रशांत कमानी यांनी सांगितले की, मी कॉलेजनंतर पहिल्यांदा परदेशात गेलो तेव्हा खूप घाबरलो होतो परंतु तेवढाच उत्साही होतो. मायक्रोसॉफ्ट ही माझी पहिली नोकरी होती. त्यामुळे गेली 21 वर्षे मी या कंपनीची सेवा केली आहे. पुढे ते म्हणतात की, या वर्षांत मला खूप काही शिकता आलं माझा मायक्रोसॉफ्टचा अनुभव हा वर्षात न सांगण्यासारखा असून या नोकरीतून मी खूप काही शिकलो त्याचसोबत मला वेगवेगळ्या टप्प्यातून जाता आहे. त्यामुळे मी या नोकरीतून माझी कृतज्ञता व्यक्त करतो.
ते त्यांच्या पोस्टमध्ये म्हणतात की, माझ्या आयुष्यात या काळात खूप चांगली माणसं आली. माझ्याशी खूप चांगल्या रीतीनं माणसं जोडली गेली. त्याचसोबतच त्यांचे आणि माझे नातेसंबंधीही खूप चांगले राहिले आहेत. आम्ही एकमेकांसोबत वैयक्तिक वेळही घालवला आहे. त्यामुळे आम्ही एकमेकांसाठी एक परिवार झालो होतो. तेव्हा मी सगळ्यांचे आभार मानतो. अशी भावनिक पोस्ट त्यांनी लिहिली आहे.
सध्या ही पोस्ट सगळीकडेच व्हायरल होेते आहे. त्यामुळे या पोस्टकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे. ही पोस्टही सगळीकडे व्हायरल झाली असून यावर अनेकजण प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या नोकरकपातीवर नडेला यांनी सांगितली आहे की, आम्ही जरी काही विभागातून नोकर कपात केली असली तरी आम्ही काही महत्त्वाच्या विभागातही आणखीनं नोकरभरती करणार आहोत. प्रशांत कमानी यांनी दिल्लीच्या स्टिफन कॉलेजमधून कॉम्प्यूटर सायन्समधून पदवी घेतली आहे. त्यानंतर सावित्रीबाई फूले विद्यापीठातून त्याचविषयात मास्टर डिग्री घेतली आहे. 1999 साली ते या क्षेत्रात आले आणि त्यांनी त्यानंतर मायक्रोसॉफ्टमध्ये मॅनेजरच्या पदावरील काम सुरू केले होते.