मुंबई : चीनमध्ये उदयास आलेल्या कोरोना सारख्या धोकादायक विषाणूने संपूर्ण जगात हाहा:कार माजवला आहे. आतापर्यंत असंख्य लोकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहे. तर जगातील लाखो नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना सारख्या धोकोदायक आजारावर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु कोरोनाग्रस्तांचा आकडा अद्यापही खाली आलेला नाही. या धोकादायक विषाणूविरुद्ध युद्ध जिंकण्यासाठी सर्वच राष्ट्र एकमेकांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. त्यामध्ये भारताचे विशेष कौतुक करण्यात येत आहे.
एकुण आकडेवारी पाहता, आताच्या घडीला संपूर्ण जगात कोरोना रुग्णांची संख्या २३ लाख ४४ हजार ९६९ इतकी आहे. तर तब्बल १ लाख ६१ हजार १९१ रुग्णांचा या धोकोदायक विषाणूने बळी घेतला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ६ लाख ४ हजार ४२२ लोकांनी या आजारावर मात केली आहे. www.worldometers.info च्या माहितीनुसार कोरोना रुग्णांची माहिती समोर आली आहे.
त्याचप्रमाणे भारतात देखील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. सध्या भारतात कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ३६५ वर पोहोचली आहे. त्यापैकी २ हजार ४६६ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहेत, तर ५२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १३ हजार ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
धक्कादायक म्हणजे अमेरिका, स्पेन आणि इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या फार मोठी आहे. अमेरिकेतील रुग्णांची संख्याही स्पेन (१,५८,०००), इटली (१,४७,०००), जर्मनी (१,२२,०००) आणि फ्रान्स (१,१२,०००) या देशांच्या संख्येपेक्षाही जास्त आहे.
अमेरिकेत कोरोना रुग्णांची संख्या ७ लाख ३८ हजार ९२३ वर पोहोचली आहे. त्यापैकी ६८ हजार २८५ रुग्ण कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहेत, तर ३९ हजार ०१५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच क६ लाख ३१ हजार ६२३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.