मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा 'हे' जुगाड

How to Make Mosambi Juice At Home : आता घरच्या घरी मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी नाही लागणार ज्युसरची गरज... आजच करा या गोष्टींचा वापर आणि घरीच बनवा तुमच्या आवडत्या मोसंबीचा ज्युस... मोसंबीनं फक्त थंडावा वाटणार नाही तर तुम्हाला व्हिटामिन सी देखील मोठ्या प्रमाणात मिळेल. 

दिक्षा पाटील | Updated: May 31, 2023, 05:55 PM IST
मोसंबीचा ज्युस बनवण्यासाठी ज्युसर घेण्याची गरज नाही, घरच्या घरी करा 'हे' जुगाड title=
(Photo Credit : File Photo)

Mosambi Juice : उन्हाळ्यात सगळ्यांना गरज असते ती म्हणजे थंड ज्युसची. या काळात सगळ्यांना तहाणही तितकीच लागते आणि जेवण करायची इच्छा देखील होत नाही. या दरम्यान, सगळ्यात जास्त मागणी ही ज्युसची असते. पण मोसंबी जितकी स्वस्तात मिळते त्याच्या दुप्पट पैसे हे एक ज्युसवाला आपल्याकडून घेतो. मोसंबी खाल्यानं आपल्याला फक्त ज्युस पिण्याची इच्छा पूर्ण होत नाही तर त्यासोबत व्हिटामिन सीचे प्रमाण खूप जास्त असते. अनेकांना असं वाटतं की ज्युस करण्यासाठी आपल्याला ज्युसरची गरज आहे. त्याशिवाय तुम्हाला घरी ज्युस करता येणार नाही. पण मोसंबीचा ज्युस आता तुम्ही घरच्या घरी करू शकता. 

मोसंबीला बनवा नरम
मोसंबी साधारणपणे खूप कडक असते. त्यामुळे सर काढण्यास थोडी मेहनत करावी लागते. त्यामुळे आधी तिला थोडं लूज करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी थोडावेळी मोसंबीला चॉपिंग बोर्डवर हातानं हळू हळू दाबा किंवा रगडा. त्यानं मोसंबी नरम होईल. त्यानंतर मोसंबीला चांगल्या प्रकारे धुवून घ्या.

ज्युसर नसेल तर असा करा ज्युस
तुमच्याघरी जर ज्युसर नसेल तर मिक्सरमध्ये मोसंबीचा ज्यूस बनवण्याची सोपी पद्धत जाणून घ्या. नरम केलेली ही मोसंबी सोलून घ्या आणि त्यातील बिया काढून त्याचे छोटे तुकडे करा. ते तुकडे मिक्सरमध्ये टाका आणि नंतर त्याला ब्लेंड करून ग्लासमध्ये गाळून घ्या. 

हेही वाचा : लग्न नाही, तरीही वयाच्या 21 व्या Raveena Tandon झाली दोन मुलींची आई; त्या निर्णयाबद्दल म्हणाली...

मिक्सर नसेल तर कसा कराल ज्युस
तुमच्याकडे जर मिक्सर नसेल किंवा खराब झालं असेल तर तुम्ही चहाच्या कपाचा वापर करत ज्युस बनवू शकता. नरम केलेली मोसंबीला सोलून घ्या आणि मग त्याचे दोन भाग करा. त्यानंतर मोसंबीवर कप ठेवून तिला झाकून ठेवा आणि त्याला गोल-गोल फिरवा. त्यानं हळू हळू ज्युस तयार व्हायला सुरुवात होईल. असचं करत मोसंबीचा ज्युस बनवू शकता. आप व्हिस्कर या स्टील हैंड ब्लेंडर की मदद से भी आसानी मौसंबी का जूस निकाल सकते हैं।

ब्लेंडरनं बनवू शकता ज्युस
मोसंबीचे तुकडे करू घ्या. एक टोप खाली ठेवा आणि एका हातात मोसंबी पकडा आणि दुसऱ्या हातानं ब्लेंड करा असं तो पर्यंत करा जो पर्यंत संपूर्ण ज्युस तयार होत नाही. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.