Muharram 2021: पाकिस्तानच्या सिंधमध्ये शियांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट

शियांच्या मिरवणुकीत झालेल्या बॉम्बस्फोटात 5 जणांचा मृत्यू तर 41 जण जखमी

Updated: Aug 19, 2021, 04:28 PM IST
Muharram 2021:  पाकिस्तानच्या सिंधमध्ये शियांच्या मिरवणुकीत बॉम्बस्फोट title=
प्रातिनिधिक फोटो
इस्लामाबाद: अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवला आहे. तिथे परिस्थिती तणावपूर्ण आहे. भारतासह अनेक देशांमध्ये मोहरम सण साजरा होत आहे. याच सणादिवशी  सिंधमध्ये शियांच्या मिरवणुकीत मोठा बॉम्बस्फोड घडवून आणण्यात आला. या स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 41 जण जखमी आहेत. 
 
सिंधमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाहणी केली आणि जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील बहावन नगर इथे शिया समुदायाचे लोक मिरवणूक काढत होते. सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. 
 
या मिरवणुकीदरम्यान बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात 5 जणांचा मृत्यू झाला असून 41 जण जखमी आहेत. स्फोटानंतर घटनास्थळावर गोंधळ उडाला याचा फायदा घेऊन स्फोट घडवून आणणारा फरार झाला आहे. या स्फोटाची जबाबदारी अजून कोणीही घेतली नाही. तर या प्रकरणी सध्या तपासयंत्रणा कामाला लागली आहे. 
 
पाकिस्तानात इस्लामिक देश म्हणून ओळखला जात असला तरी तिथे शिया, अहमदी आणि कादियानी मुस्लीम कायमच कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर राहिले आहेत. कट्टरपंथी शिया समुदायावर हल्ला करण्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यामुळे हा स्फोटही त्यांनीच घडवला असावा अशी चर्चा आहे.