इच्छा मरणाला परवानगी, एका मिनिटात वेदनारहित मृत्यू !

Legalises Suicide Machine : इच्छा मरणाची मागणी या देशाने मान्य केली असून त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आता  एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे. 

Updated: Dec 8, 2021, 08:23 AM IST
इच्छा मरणाला परवानगी, एका मिनिटात वेदनारहित मृत्यू ! title=
PIC Courtesy : Exit International

लंडन : Switzerland Legalises Suicide Machine : इच्छा मरणाची मागणी या देशाने मान्य केली असून त्याला कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. आता  एका मिनिटात वेदनारहित मृत्यू मिळणार आहे. मृत्यू देण्यासाठी मशीन तयार करण्यात आली आहे. इच्छा मरण देणारा स्वित्झर्लंड हा पहिला देश ठरला आहे. त्यामुळे मरण 'सुखावह' झाले आहे. कोणत्याही त्रासाशिवाय 'इच्छा मरण' देणाऱ्या मशीनला स्वित्झर्लंड देशाने परवानगी दिली आहे.

अनेकवेळा वृद्ध आणि आजारी लोकांची इच्छा मरण देण्याची मागणी असते. मात्र, मानवीदृष्टीकोणातून असे करता येत नाही. त्यामुळे इच्छा असूनही इच्छा मरण घेता येत नाही. आता स्वित्झर्लंडमध्ये ही इच्छा पूर्ण होणार आहे. 'सुसाईड मशीन'ला स्वित्झर्लंडमध्ये वापराची मंजुरीही मिळाली आहे.  

इच्छा मरणासाठी मशीन

या मशीनच्या मदतीने इच्छा मरणासाठी इच्छुक व्यक्ती कोणत्याही वेदनारहित मृत्यू घेऊ शकतो. हे मशीन बनवणाऱ्या कंपनीने म्हटले आहे की, इच्छामरण असलेली व्यक्ती मशीनमध्ये गेल्यानंतर आणि मशीन बंद केल्यानंतर त्यातील ऑक्सिजनची पातळी कमी होत जाते. त्यामुळे हायपोक्सिया आणि हायपोकॅपनियामुळे व्यक्तीचा मृत्यू होतो.

मृत्यू घेण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या मशीनच्या आत बसूनदेखील ही मशीन संचालित केली जाऊ शकते. आजारपणामुळे बोलता किंवा कोणत्याही प्रकारे हालचाल करण्यात अपयशी ठरणाऱ्या रुग्णांना हे यंत्र उपयोगी ठरणार आहे, असा कंपनीने दावा केला आहे.

इच्छा मरणाची अपेक्षा बाळगणारी व्यक्ती हे मशीन त्याला पाहिजे त्या ठिकाणी घेऊन जाऊ शकते. त्यानंतर मशीनचे 'डिग्रेडेबल कॅप्सूल' (नष्ट केला जाऊ शकणारा भाग) वेगळे केले जाऊ शकते. तर उरलेला भाग शवपेटी म्हणून वापर केला जाऊ शकतो.

या मशीनचा कसा झाला जन्म?

एक्झिट इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय ना-नफा संस्था  (Exit International is an international non-profit organization ) आहे, जी स्वैच्छिक इच्छामृत्यू आणि सहाय्यक आत्महत्येचे कायदेशीरकरण करण्याचे समर्थन करते.

सुसाईड मशीन बनवण्याची कल्पना 'एग्झिट इंटरनॅशनल' या ना-नफा संस्थेचे संचालक आणि 'डॉक्टर डेथ' नावाने ओळखल्या जाणाऱ्या डॉ. फिलिप नित्शके यांनी पहिल्यांदा समोर मांडली होती. पुढील वर्षभरात देशात 'सार्को मशीन' उपलब्ध होईल, असे 'डॉक्टर डेथ' यांनी म्हटले आहे. हा आतापर्यंतचा अतिशय खर्चिक प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सध्या दोन 'सार्को मशीन' वापरासाठी तयार आहेत. तिसरी मशीन तयार करण्याचे काम सुरू आहे. पुढच्या वर्षीपर्यंत ही मशीनदेखील वापरात येऊ शकेल, असे ते म्हणाले.