इस्लामाबाद : पाकिस्तानात ११ वी सार्वजनिक निवडणूक होत आहे. मतदानानंतर लगेचच २७२ जागांसाठीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीचे निकाल हाती येण्यास सुरुवात झालेय. यात नवाब शरीफ यांचा पक्ष ४३ जागांवर तर इम्रान खानची पार्टी ६२ जागांवर तर पीपीपी २६ जागावर आणि अन्य ४६ जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, या निवडणुकीत माजी क्रिकेटर इम्रान खान याची पार्टी सर्वाधिक जागांवर पुढे आहे. त्यामुळे इम्रान खानची पार्टीचे सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत १८१ जगांची मतमोजणी झालेय. दरम्यान, दहशतवादी हाफीस सईद याच्या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.
इम्रान खान याची पार्टी जिंकण्यासाठी लष्कराचा मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. इम्रान खान याचा पक्ष पाकिस्तान जिंकण्यासाठी लष्कराचा मानस आहे. तर दुसरीकडे इम्रान खान हा भारत विरोधी आहे. याचा लाभ उठविण्यासाठी इम्रान खानचा पक्ष जिंकण्यासाठी प्रयत्न झाल्याचे म्हटले जात आहे.
पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान सुरु आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून लष्कराची मदत घेण्यात आलेय. दरम्यान, महिलांना मतदानापासून रोखण्यात आले आहे, असा काही महिलांनी आरोप केलाय. अनेक केंद्रावर महिलाना जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. लष्कराच्या जवानांनी रोखल्यापासून मतदानापासून महिलांना वंचित राहावे लागल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे मदतान करता आले नाही, असे महिलांचे म्हणणे आहे. दरम्यान, लष्करी जवानांनी म्हटलेय काही केंद्रावर आतमध्ये महिला असल्याने त्या आत जाऊ शकत नाहीत.
पाकिस्तानात सार्वजनिक निवडणुकीत इम्रान खान यांच्या पक्षाला विजयी करण्यासाठी हालचाली सुरु असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यासाठी लष्कराचे जवान असे करत आहेत, असा गंभीर आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, इम्रान खान यांच्या पक्षाला जिंकण्यासाठी सर्वकाही चालले आहे, असे सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी यांना तरुंगात कैद करण्यात आले आहे.