नवी दिल्ली : पाकिस्तानने अमेरिकेला एकतर्फी कारवाईबाबत बजावले आहे. पाकिस्तानी सैन्याने म्हटले आहे की अफगाणिस्तानला सहकार्य करण्याची इच्छा असूनही राष्ट्रीय सन्मान आणि सार्वभौमत्वाच्या संबंधात कोणताही करार केला जाऊ शकत नाही.
अमेरिकेने पाकिस्तान दिलेल्या एकतर्फी कारवाईच्या धमकीवर उत्तर देतांना लष्कर प्रवक्ते मेजर जनरल असिफ गफूर यांनी म्हटलं की, "सशस्त्र सेना मित्रांबरोबर काम करत आहे आणि असं करणं करू इच्छित आहे. पण आमच्या राष्ट्रीय सन्मानाची कोणतीही तडजोड नाही होऊ शकत. आम्ही आमच्या मित्रांबरोबर वाद घालू इच्छित नाही परंतु पाकिस्तानची सुरक्षा सुनिश्चित करू."
पाकिस्तानी माध्यमांच्या अहवालानुसार, 'अलीकडेच अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी पाकिस्तानला एकतर्फी कारवाईचा इशारा दिल्या नंतर पाकिस्तानची यावर तीव्र प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेने कथितरित्या दहशतवादी लपलेल्या इमारतींच्या विवादावर एकतर्फी कारवाई केली होती.'
सीआयएचे संचालक माईक पोम्पिओ यांनी काही दिवसांपूर्वीच असं वक्तव्य केलं होतं की, 'पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या सुरक्षित आश्रयस्थानाला संपवण्यासाठी अमेरिका काहीही करु शकतं.'