ISI funding Khalistani in Canada : भारत-कॅनडात खलिस्तान्यांच्या मुद्द्यावरुन (India vs Canada) तणाव आहे आणि या भडकलेल्या आगीत तेल ओतायचं काम करतोय तो पाकिस्तान... खलिस्तानवाद्यांनी कॅनडातल्या विविध शहरांमध्ये भारताविरोधात निदर्शनं केली. हरदीप सिंग निज्जरच्या (Hardeep Singh Nijjar) हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप करत ही निदर्शनं करण्यात आली. भारताविरुद्ध निदर्शनं पेटवण्यात मोठा हात आहे तो पाकिस्तानचा... पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI नं जगभरातल्या शीख बहुल भागात भारतविरोधी वातावरण निर्माण करण्यासाठी मोहीम सुरू केलीय. या ऑपरेशनचं नाव आहे 'ऑपरेशन के'...म्हणजेच खलिस्तान.
ISI नं पंजाब, कॅनडा, यूके, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतल्या शीख बहुल भागात एजंट सक्रिय केलेत. या माध्यमातून शीख फॉर जस्टिस ही दहशतवादी संघटना खलिस्तान्यांना कोट्यवधी रुपयांची मदत करतेय. याशिवाय विविध देशांतल्या भारतीय दूतावासांवर हल्ले करण्यासाठी ISI दहशतवाद्यांना चिथावणी देतंय. ISI पंजाबमधल्या गँगस्टर्सना मदत करतंय. एवढंच नाही तर पंजाबमध्ये हत्यारांचा पुरवठाही केला जातोय.
खलिस्तानी कारवायांसाठी दहशतवादी फंडिंगचा मोठा भाग भारतातून जात असल्याची माहिती आहे. या कारवायांना आळा घालण्यासाठी NIA ने 5-6 ऑक्टोबरला दिल्लीत देशभरातील ATS प्रमुखांची बैठक बोलावलीय. त्यात खलिस्तानी चळवळ, ISIकडून पंजाबमध्ये होणारा शस्त्रपुरवठा आणि आयएसआय इतर देशांमध्ये भारताविरोधातल्या कारवायांना देत असलेली चिथावणी हे सगळं मोडून काढायची रणनीती ठरणार आहे.
आणखी वाचा - दलाई लामा यांचे सूर बदलले? चीन- तिबेटसंदर्भात मोठं वक्तव्य
दरम्यान, एनआयएने 19 फरार खलिस्तानी दहशतवाद्यांची यादी जाहीर केली आहे. एनआयएच्या यादीत समावेश असलेल्या सर्व दहशतवाद्यांनी ब्रिटन, अमनेरिका, कॅनडा, दुबई, पाकिस्तानसह इतर देशांमध्ये आश्रय घेतलाय. त्यामुळे त्यांच्या भारतातील मालमत्ता जप्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे भारत खालिस्तानी दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आता आवळणार असल्याचं दिसतंय.