मुंबई : सध्याच्या काळात बहुतांश लोकांकडे पासपोर्ट असतो. परंतु पासपोर्ट पाहिल्यानंतर तुमच्या मनात कधी हा प्रश्न आला आहे का, की पोसपोर्टवर असलेला फोटो कधी हसरा नसतो. तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर जाणून घेऊया आज या प्रश्नामागील उत्तर..
पासपोर्ट हा कोणत्याही देशाच्या सरकारने बनवलेले कागदजत्र आहे जे आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान आपलं नागरिकत्व आणि राष्ट्रीयत्व प्रमाणित करतो. पासपोर्टशिवाय आपल्या देशाबाहेर प्रवास करणं बेकायदेशीर तसंच दंडनीय आहे.
पासपोर्टसाठी फोटो काढताना फोटोग्राफर नेहमी आपला चेहरा पूर्णपणे सामान्य आणि नॅचरल ठेवण्यास सांगतात. यावेळी फोटोग्राफर केस ठीक करा, परंतु हसू नका, असं हमखास सांगतात. यामागील मुख्य कारण म्हणजे पासपोर्टचा फोटो स्पष्ट असावा.
सुरक्षिततेची बाब लक्षात घेता बायोमेट्रिक तंत्रज्ञानाचा वापर काही देशातील विमानतळांवर सुरू करण्यात आला. यासह पासपोर्टमधील चिप पासपोर्ट असलेल्या व्यक्तीबद्दल संपूर्ण माहिती देते. तसेच, जोडलेल्या फोटोमध्ये चेहर्याच्या आकाराविषयी पूर्ण माहिती असते. जसं की दोन डोळ्यांमधील अंतर, नाक आणि हनुवटीमधील अंतर आणि तोंडाची रुंदी इत्यादी.
काही वर्षांपूर्वी याबाबत असा कोणताही नियम नव्हता. पासपोर्टच्या फोटोंमध्ये चष्मा घालण्यास देखील परवानगी होती. परंतु अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये 9/11 च्या हल्ल्यानंतर काही गोष्टींवर मनाई घालण्यात आली. हे केवळ आपल्या देशातच नाही, परंतु प्रत्येक देशात असं करण्या मनाई आहे. यामागील कारण म्हणजे पासपोर्टवरील फोटोमध्ये चेहरा योग्य दिसावा.
बायोमेट्रिक तंत्रज्ञानामुळे आपण विमानतळाच्या गेटमध्ये प्रवेश करताच आपला चेहरा कॅमेर्याच्या मदतीने ओळखला जाईल. बायोमेट्रिकमध्ये आपला फोटो आणि आपला चेहरा योग्य प्रकारे ओळखताच आपणास सहज प्रवेश मिळचो. अन्यथा तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. म्हणूनच पासपोर्ट बनवताना फोटो खूप चांगला असणं गरजेचं आहे.