नवी दिल्ली: समाजमाध्यम (सोशल मीडिया) क्षेत्रातील सर्वात मोठे संकेतस्थळ असलेल्या फेसबुकवर डेटा चोरीचा कलंक लागल्यामुळे अडचणीचा सामना करावा लागत आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने डेटा लिक झाल्याचे मान्य करत युजर्सची माफीही मागितली. पण, तरीही फेसबुकच्या अडचणी काही थांबायचे नाव घेईनात. एकामागून एक यूजर्स फेसबूक सोडून जात असताना जगातील सुप्रसिद्ध मासिक असलेल्या 'प्लेबॉय'नेही फेसबुकला सोडचिठ्ठी दिली आहे. फेसबुक हे सेक्सला जखडून ठेवत आहे. सेक्स हा विषय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचा जगभरात चाहता वर्ग आहे, असे असतानाही या महत्त्वपूर्ण विषयाकडे फेसबुक दुर्लक्ष करत असल्याचा प्लेबॉयचा आरोप आहे.
फेसबुक सोडताना 'प्लेबॉय'चे चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर कूपर हेफ्नर यांनी म्हटले आहे की, फेसबुकची साधने, दिसानिर्देश आणि कॉर्पोरेट निती आमच्या मुल्यांवर विपरीत परिणाम करते आहे. आम्ही या मद्दयावरून आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आहोत. आमचे म्हणने आहे की, फेसबुक सेक्ससारख्या महत्त्वाच्या विषयाला दुर्लक्ष करते आणि बांधूनही ठेवतो. प्लेबॉययने फेसबुक सोडणे ही खूप मोठी गोष्ट मानली जात आहे. कारण, प्लेबॉययला येणारे सर्वाधिक ट्रॅफीक हे फेसबुकवरूनच येत असे. अर्थात आजच्या जमान्यात प्लेबॉयचा प्रभाव तितका राहिला नाही. जितका आगोदरच्या काही वर्षांमध्ये होता.
दरम्यान, प्लेबॉय हा पहिल्यापासूच लैंगिकता, सेन्सॉरशिप आणि वाईट बातम्यांविरोधात आवाज उठविण्यासाठी ओळखला जातो. १०६०च्या दशकात प्लेबॉयने वर्णद्वेशाविरूद्ध पुढे येत कामही केले होते. प्लेबॉयने फेसबुक सोडण्याचा निर्णय तेव्हा घेतला आहे. जेव्हा एलन मस्कने आपल्या दोन्ही कंपन्या स्पेस X आणि टेस्लाला फेसबुक पेजवरून हटविण्यात आले आहे. जगभरातील प्रसारमाध्यमांनी दिलेल्या विविध वृत्तांनुसार केब्रिज अॅनॅलिटीका या ब्रिटीश कंपनीने फेसबुकचा ५० हजार कोटी युजर्सचा डेटा लिक केला आहे. त्यामुळे चिडलेल्या युजर्सनी #deleteFacebook हा हॅशटॅगही सोशल मीडियात ट्रोल होत आहे.