अज्ञात व्यक्तीसोबत केला असा Prank, Viral व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

प्रँक व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 

Updated: Sep 14, 2022, 03:59 PM IST
अज्ञात व्यक्तीसोबत केला असा Prank, Viral व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल title=

Social Media Viral Video: सोशल मीडियावर रील्स आणि व्हायरल व्हिडीओ पाहून कधी वेळ निघून जातो कळत नाही. आपल्या आवडीचे व्हिडीओ नेटकरी वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत असतात. यापैकी काही व्हिडीओ पोट धरून हसायला भाग पाडतात. प्रँक व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओ एक व्यक्ती हातात मोठा खोका घेऊन धावताना दिसत आहे. फ्रिजचा बॉक्स असावा असा अंदाज आहे. समुद्रकिनारी व्यक्ती हा बॉक्स घेऊन वेगाने धावतो. काही क्षणात अशी कृती करतो की तुम्हालाही हसू आवरणार नाही. 

ती व्यक्ती खोका घेऊन समुद्रकिनाऱ्यावर धावते आणि अचानक समोरून चालणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर खोका घालतो. त्यामुळे अज्ञात व्यक्ती खाली पडते. ती व्यक्ती चिडते आणि ताबडतोब रागाच्या भरात खोक्यातून बाहेर पडते. पण ही कृती नेमकी कोणी केली याबाबत कळत नाही. म्हणून आपला राग त्याच खोक्यावर काढते.

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. फक्त 27 सेकंदांचा हा व्हिडीओ हजारो वेळा पाहिला असून लाईक्सचा वर्षाव सुरु आहे. इतकेच नाही तर अनेक जण कमेंट सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. बहुतेक नेटकऱ्यांनी हसणारे इमोजी पोस्ट केले.