भारतावर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधान होणार भारतीय वंशाचे ऋषी सुनक?

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे.

शैलेश मुसळे | Updated: Oct 24, 2022, 06:21 PM IST
भारतावर अनेक वर्ष राज्य करणाऱ्या ब्रिटनचे पंतप्रधान होणार भारतीय वंशाचे ऋषी सुनक? title=

world News : जगभरातील राजकीय क्षेत्राचं लक्ष सध्या ब्रिटनवर लागलं आहे. कारण ब्रिटनला नवा पंतप्रधान मिळणार आहे. या नव्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक प्रबळ दावेदार असल्याने त्यांच्या नावाची जगभर चर्चा आहे. युनायटेड किंगडमचे नवे पंतप्रधान निवडीचा मार्ग मोकळा झालाय. भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनमध्ये पंतप्रधान होणे जवळपास निश्चित झाले आहे. सोमवारी त्यांची कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. 

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रिंगणातून माघार घेतल्याने सुनक यांची निवड निश्चित झाली आहे आणि दुसरे दावेदार, पेनी मॉर्डंट, त्यांच्याकडे आवश्यक 100 खासदार नाहीत. दुसरीकडे, बोरिस जॉन्सनचे कट्टर समर्थकही आता ऋषी सुनक यांच्या बाजूने उभे राहिलेले दिसतायंत. भारतीय वंशाच्या सुएला ब्रेव्हरमननंतर आता माजी परराष्ट्र मंत्री प्रिती पटेलही सुनक यांच्या समर्थनार्थ पुढे आल्या आहेत. देशाच्या हितासाठी सुनक यांना साथ देण्याचे आणि पक्षात एकता कायम ठेवण्याचे आवाहन दोघांनी केले आहे.

माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे जवळचे आणि निष्ठावंत मानले जाणारे प्रिती पटेल आणि सुएला ब्रेव्हरमन यांनी 10 डाऊनिंग स्ट्रीटच्या उमेदवारीतून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांना उघडपणे पाठिंबा दिला आहे.

काय म्हणाल्या प्रिती पटेल?

भारतीय वंशाच्या माजी गृहसचिव प्रिती पटेल या माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात होत्या. लिझ ट्रस पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. पटेल म्हणाले की, टोरींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून सुनक यांना नवीन नेता म्हणून यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी दिली पाहिजे. आपल्या देशासाठीच्या या कठीण काळात आपण जनसेवेला प्रथम स्थान देऊन एकजुटीने काम केले पाहिजे. त्या म्हणाल्या की आम्हाला आमच्या देशाची काळजी आहे आणि आमच्यासमोर मोठी आव्हाने आहेत, आम्ही राजकीय मतभेद बाजूला ठेवले पाहिजे जेणेकरून ऋषी सुनक यांना यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी मिळेल.

दिवाळीच्या शुभेच्छा...

प्रीती पटेलने यांनी फोटो ट्विट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं की, 'हा एक शुभ आणि आनंदाचा सण आहे. हा आत्म-चिंतन, कुटुंब, मित्र आणि इतरांची सेवा करण्याचा काळ आहे. मी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो.'