World First Mobile: आज प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोनवर (Mobile) अवलंबून आहे. आजच्या आधुनिक युगात मोबाईलशिवाय जगणे शक्य नाही. शॅपिंग असो किंवा घरी जेवण ऑर्डर करणे असो, ऑनलाइन पेमेंट करणे असो, प्रत्येक जण यासाठी मोबाईलचा वापर करतो. आज मोबाईलच्या 170 कंपन्या बाजारात आहे आणि त्या 170 कंपन्यांचे लाखो मोबाईल आहे. पण तुम्हाला माहिती आहे का जगातला पहिला मोबाईल (World First Mobile) कोणत्या कंपनीचा होता? त्या मोबाईलची किंमत किती होती? अनेक लोकांना याची पुरेशी माहिती नाही. आज आम्ही, तुम्हाला सांगणार आहोत की जगातला पहिला मोबाईल कोणी बनवला आणि तो कोणत्या कंपनीने तयार केला. त्याची किंमत काय होती.
जगातला पहिला मोबाईल
जगातला पहिला मोबईल फोन हा तब्बल दोन किलो वजनाचा होता. या फोनला Motorola कंपनीने 1984 साली तयार केलं होतं. Motorola च्या या फोनचं नाव Motorola’s DynaTAC 6000X असं होतं. या फोनमध्ये 14 डिजीटच्या एलईडी डिस्पलेसोबत प्रोग्रामिंगसाठी किपॅड आणि कॉल अलर्ट किंवा लाइट फिचर सुध्दा होता
पहिल्यांदा कोणी आणी कधी वापरला?
न्यूयॉर्कमध्ये राहाणाऱ्या मार्टिन कुपर (Martin Cooper) यांनी पहिला मोबाईल बनवला आणि त्यांनीच त्याच्या वापराला सुरुवात केली. त्यांनी पहिला कॅाल स्वत:च्या टिमला केला. हा फोन बनवण्यासाठी तेव्हा तब्बल 8 कोटींचा खर्च आला होता. पहिला मोबाईल फोन 1973 साली बनवला. त्यानंतर 1983 साली तो मार्केटमध्ये आला. म्हणजे पहिला मोबाईल फोन सामान्यांना उपलब्ध होण्यासाठी तब्बल 10 वर्ष लागली. Motorola DynaTAC 6000X या फोनची विक्री पहिल्यांदाच यूएस मार्केटमध्ये सुरू झाली. त्यावेळी या मोबाईलची किंमत 3,399 डॉलर म्हणजेच भारतीय रुपयांत 2,40,712 इतकी ठरविण्यात आली होती.
चार्जिंगसाठी प्रचंड वेळ
मोटोररोला कंपनीचा हा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी तासांचा 10 तासांचा वेळ लागायचा. इतका वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची बॅटरी अवघी 30 मिनिट टिकायची.
भारतात मोठी बाजारपेठ
1983 मध्ये आलेल्या पहिल्या मोबाईलनंतर या क्षेत्रात अनेक कंपन्या उतरल्या. या फोनमध्ये आमूलाग्र बदल होत गेले. पूर्वी केवळ श्रीमंतांकडे आढळणारे मोबाईल फोन आता गावाखेड्यातील गरीबातल्या गरीब लोकांच्या हाती पोहोचलेत. भारतीय बाजारपेठेत सध्या अॅपल, सॅमसंग, वनप्लस, सोनी, मायक्रोमॅक्स, रिअलमी, विवो, ओप्पो, नोकियासारख्या अनेक कंपन्या आहेत. भारतात मोबाईल वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे.