VIDEO : धावत्या बाइकवर तरुणीचा स्वॅग! 'पापा की परी' हवेत उडताना...

Viral Video : सोशल मीडियावर एका तरुणीच्या धावत्या बाइकवरील स्टंट नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. रस्त्यावर गाड्यांची वर्दळ सुरु असताना अशाप्रकारचं तरुणीचं बाइक चालण्यामुळे...  

Updated: Jan 17, 2023, 02:27 PM IST
VIDEO :  धावत्या बाइकवर तरुणीचा स्वॅग! 'पापा की परी' हवेत उडताना... title=
Trending Video Girl stunt on a running bike Fast Speed cost a couple dearly Papa Ki Pari viral on Social media

Trending Video : सोशल मीडियावर बाइकवर (stunt Video) किंवा कारसोबत स्टंट करणारे अनेक बाइकरचे व्हिडीओ आपण पाहिले आहेत. आजच्या तरुण पिढीला गाड्या म्हणजे खेळातील वस्तू वाटते. पण या बाइकचा वापर करताना स्वत:च्या जीवासोबत रस्त्यावरील इतर लोकांचाही जीवाचीही काळजी घ्यायची असते. पण काही तरुण स्टंटच्या नावाखाली रस्त्यावर नको तशी गाडी चालवतात. सोशल मीडियावर सध्या एका बुलेट राणीचा (Bullet Queen Video)व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. त्यातच आता पापा की परीचा धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) समोर आला आहे. 

बाइकवर तरुणीचा स्वॅग! 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरूणी आपली बाइक डोलत डोलत वाकडीतिकडी चालवत आहे. काही वेळाने या रस्त्यावरून एक जोडपं सुद्धा बाइकवरुन येतं आणि तितक्यात या तरुणीचं बाइकवरील नियंत्रण सुटतं...अशात ज्याची भीती होती तेच झालं...या तरुणीमुळे बाइकवरील जोडप्याचा बाइकला अपघात होतो. ती पापा की परी स्वत:चा जीव धोक्यात घालतेच त्यासोबत तीने त्या जोडप्याचाही जीव धोक्यात घातला. (Trending Video Girl stunt on a running bike Fast Speed cost a couple dearly Papa Ki Pari viral on Social media)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Payal Tyagi (@payaltyagi946)

 'पापा की परी' वर नेटकरी संतापले

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर payaltyagi946 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. हा व्हिडीओ पाहून नेटकरी संतापले आहेत. कारण या तरुणाच्या स्टंटमुळे एका जोडप्याचा काही चूक नसतानाही अपघात झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.  या व्हिडीओ आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.