वॉशिंग्टन : कोरोना व्हायरस हा चीनमुळेच पसरला याबद्दल संपूर्ण जगाला शंका आहे. काही देश चीन विरुद्ध उघडपणे बोलत आहेत. हळूहळू संपूर्ण जग चीनच्या विरोधात एकत्र येत आहे. अमेरिके सारखा शक्तिशाली देश कोरोनाचा सर्वात मोठा बळी ठरला आहे. कोरोनासंदर्भात अमेरिकेने ऑपरेशन चीनची तयारी सुरू केली आहे.
अलीकडेच ट्रम्प यांनी चीनला उघडपणे आव्हान दिले होते की, चूक ती चूकच आहे. परंतु हे हेतूपूर्वक केले गेले तर त्याचे गंभीर परिणाम नक्कीच भोगावे लागतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून हे स्पष्ट झाले आहे की कोरोनावरुन अमेरिका आणि चीन यांच्यात युद्ध सुरू होऊ शकते. चीनविरूद्ध कोरोनाबाबतच्या शंका खऱ्या निघाल्या तर चीनला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
चीनच्या वुहानमधील धोकादायक प्रयोगशाळा संपूर्ण जग पहात आहे. वुहानच्या लॅबमधून कोरोना विषाणू बाहेर आला आहे की नाही याबद्दल अमेरिकेने आता चौकशी करायची आहे.
तपासासंदर्भात ट्रम्प हे अमेरिकेची तज्ञ टीम तपासासाठी चीनमध्ये पाठण्याच्या तयारीत आहेत. ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की, अमेरिकेचं तपास पथक पाठविण्यासाठी चीनशी बोललो आहे, परंतु चीनने अद्याप त्यास प्रतिसाद दिला नाही. पण त्यानंतर चीनने मात्र ट्रम्प यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. कोरोना व्हायरसचे आम्ही गुन्हेगार नाही, तर पीडित आहोत, अशी प्रतिक्रिया चीनने दिली आहे.
चीन कोरोनाबाबत सत्य सांगत नाही, त्यामुळे संपूर्ण जग चीनवर संतापलं आहे. स्वत: राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सार्वजनिक स्टेजवरुन चीनविरोधात नाराजी व्यक्त करत आहेत. ट्रम्प यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, चीनमध्ये काय घडले याबाबत त्यांनी माहिती दिली नाही. मी या धोरणामुळे नाराज आहे.
वुहानच्या व्हायरोलॉजी लॅबमधून कोरोनाचा विषाणू बाहेर आल्याचा संशय आहे. ही तीच लॅब आहे जिथे अमेरिका संशोधन करण्यासाठी निधीही देत असे. परंतु या लॅबमध्ये तयार केलेला कोरोना विषाणू अमेरिकेसाठी इतका मोठा धोका होईल याची थोडीशी कल्पनाही अमेरिकेला नव्हती. आता अमेरिकेने या बाबत चौकशी सुरू केली आहे. परंतु चीनने अमेरिकेची ही मागणी धुडकावून लावल्यामुळे आता अमेरिका आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे.