Video: फूटबॉलचा सामना रंगला होता, प्रेक्षक चिअर करत होते, तितक्यात मैदानात ट्रेन आली आणि...

सोशल मीडियावर सध्या एका Video चांगलाच व्हायरल होत आहे, फूटबॉल सामन्यादरम्यान चक्क ट्रेन मैदानात आली, पाहा Video

Updated: Nov 21, 2022, 08:46 PM IST
Video: फूटबॉलचा सामना रंगला होता, प्रेक्षक चिअर करत होते, तितक्यात मैदानात ट्रेन आली आणि... title=

Railway Viral Video: जगभरात सध्या फूटबॉल फिव्हर सुरु आहे. याला कारण आहे कतारमध्ये (Qatar) सुरु असलेल्या फूटबॉल वर्ल्ड कप. फिफा वर्ल्ड कपमध्ये (FIFA World Cup 2022) यावेळी 32 संघ सहभागी झाले असून 20 नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष स्पर्धेला सुरुवातही झालीय. जगभरातील लाखो फूटबॉल प्रेमी कतारमध्ये पोहोचलेत. आपल्या देशाच्या, आपल्या आवडत्या संघाला, आवडत्या खेळाडूला सपोर्ट करण्यासाठी चाहते स्टेडिअममध्ये गर्दी करतात.

कतारमध्ये फूटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा रंगलेली असतानाच सोशल मीडियावर (Social Media) फूटबॉल सामन्याचा एक व्हिडिओ (Video) चांगलाच व्हायरत होत आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सने आश्चर्य व्यक्त केलं आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओमध्ये?
व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक स्टेडिअममध्ये दोन संघांदरम्यान फूटबॉल सामना सुरु आहे. प्रेक्षक आपल्या आवडत्या संघाला सपोर्ट करताना दिसत आहे. पण तितक्यात एक ट्रेन मैदानातून जाताना दिसत आहे. ट्रेन चक्क मैदानाच्या बाऊंड्री लाईनबाहेरुन जाताना दिसतेय. ट्रेन जात असताना सामना मात्र तसाच सुरु आहे. 

व्हायरल होणारा हा व्हिडिओ नरेंद्र सिंह नावाच्या एका युजरने शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून युजर्सना आपल्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठिण झालं आहे. नरेंद्र सिंह यांनी व्हिडिओबरोबर एक कॅप्शनही लिहिलाय, त्यात त्यांनी म्हटलंय, हा व्हिडिओ स्लोवाकियामधल्या (Slovakia) नॅरो गेज रेल्वेचा (Narrow Gauge Railway) आहे. जगातील हा एकमेव रेल्वे मार्ग आहे जो फूटबॉल स्टेडिअममधून (Football Stadium) जातो.

नॅरोगेज रेल्वेचा प्राचीन इतिहास
हा व्हिडिओ स्वप्नवत वाटणारा असाच आहे. वास्तविक स्लोवाकियामध्ये 1898 साली फॉरेस्ट रेल्वेसाठी योजना तयार करण्यात आली. यासाठी 1908 मध्ये नॅरो गेज रेल्वेची निर्मिती करण्यात आली. या रेल्वे मार्गावरुन जंगलात मोठमोठ्याला लाकडाच्या ओंडक्यांची ने-आण केली जात होती. त्यावेळी हा रेल्वे मार्ग जवळपास 131.97 किमी इतका होता. आता तो केवळ 17 किमी इतकाच उरला आहे. या मार्गातच हे फुटबॉल स्टेडिअम येतं. टीजे टाट्रान सिएरनी बालोग क्लबचं हे स्टेडिअम असून मैदानातून ही नॅरो गेज रेल्वे जाते. हा दृष्य पाहण्यासाठी हजारो लोक या स्टेडिअमला भेट देतात.