Trending Video : सोशल मीडियाच्या उपलब्धतेमुळं जग खऱ्या अर्थानं जवळ आलं आहे. अर्थात याबाबद अनेकांची संमिश्र मतं आहेत. पण, काही प्रसंगी या माध्यमाची नकारात्मक बाजू दूर ठेवली असता त्यामुळं जगाच्या पाठीवर कुठं नेमकं काय सुरुये हे मात्र आपल्याला अगदी सहजपणे लक्षात येतं. सध्या जगाच्या एका टोकावर घडलेली अशीच एक थरारक घटना सर्वांसमोर आली आणि पाहणारे थक्क झाले.
सध्या घडलेली घटना काहीशी टायटॅनिक जहाजाच्या अपघाताच्या क्षणांची आठवण करून देते आणि भीतीनं वाचणाऱ्यांचे आणि जहाज पाहणाऱ्यांचेही डोळे विस्फारतात. बीबीसीच्या वृत्तानुसार RRS Sir David Attenborough या युकेच्या पोलार जहाजापुढं एकाएकी महाकाय हिमनग आला आणि जहाजावर असणाऱ्या प्रत्येकाच्याच काळजाचा ठोका चुकला.
मुळात ठरल्या मार्गानं हे जहाज पुढे नेत असताना ज्याची शक्यता होती तेच झालं आणि समोर जगातील एक चमत्कारच उभा ठाकला. ग्रेटर लंडनच्या दुप्पट आणि न्यूयॉर्क शहराच्या तिप्पट आकाराच्या या हिमनगाचं नाव A23aय. साधारण 3,900 चौरस किलोमीटर अर्थात 1500 चौरस मैल इतकं क्षेत्रफळ असणारा हा हिमनग नेमका किती मोठा असेल याचा अंदाज तुम्हाल लावता येतोय का?
1986 ला अंटार्क्टिकच्या किनाऱ्यावरून हा हिमनग वेगळा झाला आणि बराच काळ तिथंच अडकून पडला होता. पण, आता मात्र पाण्याचा प्रवाह आणि वाऱ्याच्या दाबामुळं तो थेट Weddell Sea पर्यंत येऊन पोहोचल्याची माहिती तज्ज्ञ देतात. गेल्या 37 वर्षांमध्ये हा हिमनग आता पुढे पुढे सरकत असल्यामुळं यावर संशोधकही नजर ठेवून आहेत. हा हिमनग जवळ येत असतानाच जहाजावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी त्याचा एक थरारक व्हिडीओ टीपला, ज्यासंदर्भातील माहिती ब्रिटीश अंटार्क्टिक सर्व्हेच्या वतीनं देण्यात आली. इतका मोठा आणि भव्य स्वरुपाती हिमकडा प्रत्यक्षात पाहणं अविश्वसनीय असल्याचीच प्रतिक्रिया RRS Sir David Attenborough जहाजावरील प्रमुख संशोधक Dr Andrew Meijers सांगतात.
The #RRSSirDavidAttenborough has visited the largest iceberg in the world, #A23a
It's 3,900km2 - so a bit bigger than Cornwall.
The epic team on board, including Theresa Gossman, Matthew Gascoyne & Christopher Grey, got us this footage. pic.twitter.com/d1fOprVWZL
— British Antarctic Survey (@BAS_News) December 4, 2023
येत्या काळात A23a हा हिमकडा पुन्हा एकदा जॉर्जियाच्या दक्षिणेकडील बेटांकडे स्थिरावणार असून, अंटार्क्टिकातील वन्यजीवसृष्टीसाठी चिंतेची बाब ठरू शकतो. या बेटावर अनेक सील, पेंग्विन आणि समुद्री पक्ष्यांचा वावर असून हे सर्व आजुबाजूच्या जलस्त्रोतांवर अवलंबून आहेत. पण, हिमनग इथवर पोहोचल्यास या प्राणी आणि पक्ष्यांचा वावर असणाऱ्या भागापर्यंत त्यांना पोहोचता येणार नसल्यामुळं नव्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.