मुंबई: आपण दिवस किंवा एखादी गोष्ट लकी किंवा अनलकी मानतो. आपल्या मनाचं सामनाधान असतं ते. एखादा रंग, ड्रेस, वार महिना किंवा अशा अनेक गोष्टी आपल्याला आवडत नसतात. पण तुम्हाला एक रंजक गोष्ट माहिती आहे का हे केवळ भारतातच नाही तर जगभरात असं घडत असतं. जगभरात असे काही आकडे आहेत जे अनलकी मानले जातात. तसं मानण्याची तिथल्या लोकांची एक वेगळी परंपरा आणि कारणं आहेत.
जगात जेवढे देश तेवढ्या वेगवेगळ्या परंपरा आहेत. मात्र एखादा आकडा किंवा नंबर प्रत्येक देशात शुभ किंवा अशुभ ठरवण्याची परंपरा सारखीच आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल कदाचित. पण हो प्रत्येक देशात कुठलातरी एक अंक हा शुभ आणि अशुभ मानला जातो. त्याची प्रत्येक देशानुसार कारणं वेगळी आहेत.
द मिररने दिलेल्या वृत्तानुसार, जगातील सर्वात विकसित देश असलेल्या ब्रिटनमध्ये ही एक सामान्य परंपरा आहे की जर दररोज सकाळी 11.11 वाजता येशू ख्रिस्ताला प्रार्थना केली. तर तुमची मनोकामना पूर्ण होते. यावर विश्वास ठेवायचा की नाही ते प्रत्येकाच्या मनावर आहे. मात्र याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. काही लोक याला श्रद्धेचे नाव देतात तर काही लोक अंधश्रद्धा म्हणतात.
समाजशास्त्रज्ञांच्या मते, जगभरातील लोक काही गोष्टींवर विश्वास ठेवतात तसेच काही गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करतात. ते नेहमी असे काही आकडे आहेत ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करतात. हे आकडे काही लोकांना अशुभ वाटतात.
13 क्रमांकापासून दूर पळतात लोक
जगातील सर्वात अशुभ अंक 13 मानला जातो. बिल्डिंग किंवा रहिवासी इमारतीमध्ये 13 क्रमांकाची खोली किंवा 13 वा मजला क्वचितच असतो. शक्यतो नसतोच बऱ्याचदा भारतातही 13 व्या क्रमांकाच घर किंवा खोली पाहिली नसावी. Norse mythology च्या कथेनुसार, लोकी, 13 व्या लोकीने देवतांच्या रात्रीच्या जेवणात खोळंबा घातला. त्यामुळे ही तारीख अशुभ मानली जाते. एका कथेनुसार, हा अशुभ क्रमांक 13 बायबलमधून आला आहे असंही सांगितलं जातं.
4 नंबर चीनमध्ये मानला जातो अशुभ
चीनमध्ये 4 नंबर अशुभ मानला जातो. याचे कारण म्हणजे 'चार' या शब्दाचा उच्चार चिनी भाषेतील मृत्यू या शब्दासारखा आहे. त्यामुळेच चीनमधील अनेक इमारतींमध्ये तिसऱ्या मजल्यानंतर थेट पाचवा मजला येतो. तेथे रस्त्यांची नावंही चार आकड्यावरून ठेवणं टाळलं जातं. रस्ता किंवा इमारतीमध्ये 4 क्रमांकाचा मजला असल्यास लोक तेथे राहणे टाळतात. चीनसोबतच अनेक अनेक कंपन्याही 4 नंबरचा वापर टाळतात. जपानी कॅमेरा निर्माता फूजीने मालिका 3 सीरिजनंतर चौथी सीरिज न आणता थेट पाचवी सीरिज लाँच केली.
इटलीमध्ये अशुभ आहे 17 नंबर
इटलीमध्ये 17 नंबर अशुभ मानला जातो. कारण 'VIXI' हा शब्द देखील रोमन क्रमांक XVII ची पुनर्रचना करून तयार झाला आहे. ज्याचा लॅटिनमध्ये अर्थ 'माझे आयुष्य आता पूर्ण झालं'. त्यामुळेच इटलीतील लोकांना 17 हा क्रमांक आवडत नाही. जेव्हा जेव्हा महिन्याची 17 तारीख येते तेव्हा तिथली दुकानं बंद ठेवली जातात.कोणत्याही वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी प्रार्थना करतात.
536 क्रमांकाची दहशत
चीनसह जगातील अनेक देशांमध्ये 536 नंबरची मोठी दहशत आहे असे मानले जाते. इसवी सन 536 मध्ये जगात एक भयंकर आपत्ती आली होती. त्या काळात गूढ धुक्याने युरोप, मध्य पूर्व आणि आशियाचा काही भाग 18 महिने रात्रंदिवस अंधारात व्यापला होता. त्या वर्षी जगाचे तापमान २.५ अंश सेल्सिअसने घसरले होते. त्यावेळी मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आजही हा आकडा अनेकांना आवडत नाही. अशुभ असल्याने तो टाळतात.
9 नंबरपासून जपानी लोक घाबरतात
जपानमध्ये 9 हा आकडा वाईट आकडा म्हणून पाहिला जातो. इंग्रजीतील नऊ हा शब्द जपानी भाषेतील आजार किंवा मृत्यू या शब्दासारखा वाटतो. म्हणूनच जपानचे लोक 9 नंबर वापरणे टाळण्याचा प्रयत्न करतात. या देशात मजला क्रमांक 9 किंवा 9 क्रमांकाचे रस्ते किंवा वाहने नाहीत.
अफगाणिस्तानत 39 क्रमांक आहे अशुभ
अफगाणिस्तानमध्ये 39 क्रमांक अशुभ मानला जातो. तिथे 39 क्रमांकाचे भाषांतर 'मोरडा-गौ' म्हणजेच मृत गाय असं समजलं जातं. तिथे दलालांसाठी 'मोरडा-गो' हा शब्दही वापरला जातो. म्हणूनच लोक 39 क्रमांकाचे रस्ते, घरे, वाहने किंवा काहीही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करतात.
अमेरिकेसाठी अनलकी आहे 666 नंबर
अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांमध्ये, 666 क्रमांक अनलकी नंबर समजला जातो. ही संख्या बायबलशी संबंधित आहे. असे मानले जाते की बायबलमध्ये John the Apostle यांनी ईसा मसीह यांचा विरोध करण्यासाठी हा क्रमांक वापरला होता. त्यामुळे हा क्रमांक अमेरिकेत वापरणं शक्यतो टाळलं जातं.
(महत्त्वाची सूचना- ही माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे. झी 24 तास या माहितीची कोणतीही पुष्टी करत नाही.)