भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा क्रिकेटर पार पाडतोय पोलिसाची ड्यूटी, ICC ने केला सलाम

हा क्रिकेटर आता आहे डिएसपी

Updated: Mar 29, 2020, 12:06 PM IST
भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा क्रिकेटर पार पाडतोय पोलिसाची ड्यूटी, ICC ने केला सलाम title=

मुंबई : २००७ च्या टी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पाकिस्तान विरुद्ध शेवटची ओव्हर यशस्वी पणे टाकणार आणि शेवटची विकेट घेऊन भारताला वर्ल्डकप जिंकवून देणारा गोलंदाज आजही अनेकांना आठवत असेल. भारताचा गोलंदाज जोगिंदर शर्मा हा फायनलचा हीरो ठरला होता. त्याने सर्व भारतीयांचं मन जिंकलं होतं.

जोगिंदर शर्मा सध्या कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू असताना आपली ड्यूटी करत आहे. जोगिंदर शर्मा हरियाणा पोलिसात डीएसपी पदावर आहे. आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या जोगिंदर शर्माला आयसीसीने ही सलाम केला आहे.

आयसीसीने जोगिंदर शर्माचं कौतुक करत ट्विट केलं आहे की, '२००७ च्या टी-२० वर्ल्डकपचा हीरो आणि २०२० मध्ये जगातील रियल हीरो. क्रिकेट करिअरनंतर जोगिंदर शर्मा वैश्विक आरोग्य संकटा दरम्यान आपलं कर्तव्य बजावत आहे.' 

याआधी जोगिंदर शर्माने ट्विट करत म्हटलं होतं की, मी २००७ पासून हरियाणा पोलिसात डीएसपी आहे. यावेळी एक वेगळं आव्हान आहे. आपची ड्युटी पहाटे सहा पासून सुरु आहे. लोकांना जागरूक करणे, बंद पाळणे आणि वैद्यकीय सुविधा देणे याचा समावेश आहे.'

जोगिंदर शर्माने इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत लोकांना घरातच राहण्याचं आवाहन करत आहे. एक हजाराहून अधिक जण कोरोना संक्रमित आहेत. तर जवळपास २५ लोकांचा मृत्यू झाला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jogi Sharma 23 Oct (@jogi23sharma) on

२००७ टी-२० वर्ल्डकप फायनलची शेवटची ओव्हर