बर्थडे स्पेशल : म्हणून आजही सगळे बॉलर 'गब्बर'ला घाबरतात

मैदानात असताना वेगळाच अंदाज सादर करणारा, गब्बर या प्रसिद्ध असणारा शिखर धवन त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Updated: Dec 5, 2018, 10:06 PM IST
बर्थडे स्पेशल : म्हणून आजही सगळे बॉलर 'गब्बर'ला घाबरतात title=

मुंबई: मैदानात असताना वेगळाच अंदाज सादर करणारा, गब्बर या नावानं प्रसिद्ध असणारा शिखर धवन त्याचा ३३वा वाढदिवस साजरा करत आहे. भारतीय टीमचा ओपनिंग बॅट्समन शिखर धवनचा जन्म ५ डिसेंबर १९८५ रोजी दिल्लीत झाला. शिखर धवन हा टी-२० आणि एकदिवसीय फॉर्मेटमधील स्पेशल बॅट्समन आहे. 

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये शिखर धवनला टीममध्ये निवडण्यात आलं नाही. याच दौऱ्याच्या टी-२० सीरीज मध्ये मॅन ऑफ द सीरीजचा मान शिखरने मिळवला.

शिखर धवनचं ऑस्ट्रेलियासोबत अनोख नातं आहे. २० ऑक्टोबर २०१० रोजी शिखरने ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याचा वनडे कारकिर्दीची सुरुवात केली होती. २०१३ मध्येच त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहीली टेस्ट मॅच खेळली होती. शिखरची पत्नी ऑस्ट्रेलियाची आहे.  मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटमध्ये शिखर यशस्वी ठरला असला तरी टेस्ट मॅचमध्ये त्याचा पदरी निराशा आली आहे. या निराशेचा परीणाम त्याच्या वनडे आणि टी-२० च्या खेळीवर अजिबात झालेला नाही.

पदार्पणातल्या टेस्टमध्येच शानदार शतकं

२०१३ साली ऑस्ट्रेलियाची टीम भारताच्या दौऱ्यावर आली असताना शिखर धवनच्या टेस्ट कारकिर्दीला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात शिखरने १७४ बॅालमध्ये ३३ फोर आणि २ सिक्सच्या मदतीने १८७ रन केले. त्यामुळे भारताने पहिल्या दिवसात ४०८ रन बनवले. शिखरचं हे पदार्पणातील सगळ्यात जलद शतक होतं. त्याने ८५ बॉलमध्येच शतक पूर्ण केलं होतं. हे रेकार्ड आजही कायम आहे. पहील्या दिवसाच्या लंच अगोदर शतक करणारा शिखर पहिला भारतीय बॅट्समन आहे.

शिखरचे रेकार्ड

- २०१३ मध्ये इंटरनॅशनल 'प्लेयर ऑफ द इयर' चा किताब त्याचा नावावर होता.

- २०१५ मधील आयसीसी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन

- आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ आणि २०१७ सर्वाधिक रन

- २०१४ मध्ये विजडन क्रिकेटर ऑफ द इयर चा किताब

- २०१८ मधील दक्षिण अफ्रीका टी-२० सीरीज दौऱ्यात सर्वाधिक रन

- निदाहस ट्रॉफी २०१८ मध्ये सर्वात जास्त रन बनवणारा पहिला भारतीय खेळाडू

- २०१८ साली इंटरनॅशनल बॅट्समॅन ऑफ द इयरचा मान मिळवला

- सर्वात जलद १ हजार, २ हजार, ३ हजार बनवणारा पहिला भारतीय खेळाडू

- आयसीसी टूर्नामेन्ट्स मधील सर्वात जलद १ हजार रन

- २०१८मधील टी-२० क्रिकेट मध्ये आतापर्यंत सर्वाधिक रन शिखरच्या नावावर आहे

वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये अपार यश मिळवणारा शिखर टेस्टमध्ये खास कामगिरी करु शकला नाही. मात्र, भारतीय मैदानात त्यांच रेकार्ड चांगलं आहे. शिखरनं आतापर्यंत ३४ टेस्ट सामन्यात ४०.६१ च्या सरासरीने ७ शतकासह २३१५ रन केले आहेत. त्यात शिखरचा सर्वाधिक स्कोर १९० आहे. त्यानं देशाबाहेर २३ टेस्ट मध्ये १६०५ रन केले आहेत. परदेशात शिखरने ५ शतकं आणि ३ अर्धशतकं केली आहेत.

२०१८ मधील टेस्ट रेकार्ड

भारतीय मैदानात शिखरची सरासरी ४४.३७ आहे, तर परदेशात जास्त मॅच खेळून त्याची सरासरी ३९.१४ आहे. हे आकडे चांगले असूनही अलीकडच्या परदेशातील टेस्ट मॅचमध्ये त्याचं रेकार्ड निराशाजनक आहे.  यावर्षी परदेशात शिखरने ५ सामन्यात १९.४० सरासरीने १९४ रन बनवले आहेत. त्यात त्याचा सर्वाधिक स्कोर ४४ रन आहे.

शिखरेने वनडेत ११५ सामन्यात ४५.६९ सरासरीने ४९३५ रन केले आहेत. यामध्ये १५ शतकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक स्कोर १३७ रन आहेत. तसेच ४६ टी-२० सामन्यात १२३२ रन केले आहेत. यामध्ये सर्वाधिक स्कोर  ९२ रन आहेत. वनडे रॅकिंग मध्ये शिखर ८ व्या तर टी-२० रॅकिंगमध्ये ११ व्या स्थानकावर आहे.