या मोठ्या कंपन्यांच्या लोगोत दडलाय हा अर्थ!

अॅमेझॉनपासून सोनीपर्यंत अनेक कंपन्यांची नावे आपण नेहमीच ऐकतो.

Updated: May 19, 2018, 11:55 AM IST
या मोठ्या कंपन्यांच्या लोगोत दडलाय हा अर्थ! title=

मुंबई : अॅमेझॉनपासून सोनीपर्यंत अनेक कंपन्यांची नावे आपण नेहमीच ऐकतो. यापैकी काही कंपन्यांची सेवा तर काही कंपन्याचे प्रॉडक्ट्स जगात लोकप्रिय आहेत. यांची ओळख त्यांच्या लोगोत लपलेली आहे. हे लोगो अत्यंत विचार करून डिजाईन केलेले असतात. या लोगोत काही अर्थ दडलेला असतो. तर जाणून घेऊया कंपन्यांच्या लोगोमागील दडलेला अर्थ...

अॅमेझॉन

A आणि Z च्या मधील बाण हे दाखवतो की, कंपनी A ते Z पासून सर्व सामान विकते.

भारतात अॅमेझॉन गुंतवणार २१ हजार कोटी रुपये

Baskin Robbins

BR च्या डार्क पिंक रंगावर नीट लक्ष दिल्यास त्यात तुम्हाला ‘31’नंबर दिसेल. 31 आईस्क्रीम फ्लेवर्स कंपनी विकते, असे यातून प्रतीत होते.

Goodwill

या लोगोत  G वर लक्ष दिल्यास त्यात तुम्हाला एक हसतानाचा स्माईली फेस दिसेल.

goodwill logo साठी इमेज परिणाम

Hope for African Children Initiative

या लोगोत आफ्रिका महाद्वीपची झलक दिसेल. याशिवाय लोगोत अजून काही खास आहे. लोगो नीट पाहिल्यास एका बाजूला एक लहान मुलगा तर एका बाजूला एक वयस्क व्यक्तीची झलक दिसेल.

Pinterest

यात P वर लक्ष दिल्यास ते एका बोर्डपिनप्रमाणे दिसेल.

Pinterest साठी इमेज परिणाम

Sony VAIO

यात VA अनलॉग वेव आणि IO डिजिटल वेव दर्शवतो.

sony vaio logo साठी इमेज परिणाम