चंदीगडच्या जुळ्या बहिणींना बारावीत मार्कही सारखेच

चंदीगडमधल्या या नेहा गोयल आणि तिची जुळी बहीण तन्या गोयल यांचा जन्म केवळ तीन मिनिटांच्या फरकाने झाला. अंकाचा हाच फरक त्यांच्या बारावीच्या गुणांमध्येही दिसला. 

Updated: May 29, 2017, 09:09 PM IST
चंदीगडच्या  जुळ्या बहिणींना बारावीत मार्कही सारखेच  title=

चंदीगड : चंदीगडमधल्या या नेहा गोयल आणि तिची जुळी बहीण तन्या गोयल यांचा जन्म केवळ तीन मिनिटांच्या फरकाने झाला. अंकाचा हाच फरक त्यांच्या बारावीच्या गुणांमध्येही दिसला. 

नुकताच सीबीसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला. या निकालात नेहा आणि तन्या यांनी ९८.६ आणि ९८.४ टक्के मिळवले. या गुणांमध्ये केवळ ०.२ चा फरक पडला. 

या योगायोगाबद्दल त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या, यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाहीये. आम्हाला दोघींना असेच मार्क मिळतात. आयएएस ऑफिसर्सच्या घरात जन्मलेल्या या जुळ्या बहिणींनाही नागरी सेवेत जायचे आहे. या दोघीही बहिणी दररोज १०-१२ तास अभ्यास करत. दोघीही एकाच खोलीत बसून अभ्यास करत. स्वत:च्या नोट्स स्वत: तयार करत.