प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकरवंचित बहुजन आघाडी

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी झाला. प्रकाश आंबेडकर हे वकील आहेत. भारिप बहुजन महासंघाचे ते राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश आंबेडकर यांची आणखी एक मोठी ओळख म्हणजे ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून १९९८ आणि १९९९ मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अकोला मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते. २००४, २००९ आणि २०१४ या सलग तीन निवडणुकीत भारिप-बमसंने अकोला लोकसभा मतदारसंघात स्वबळावर निवडणूक लढवली. १९९८ आणि १९९९ मध्ये प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसच्या पाठिंब्यावर लोकसभा निवडणूक लढवली होती. प्रकाश आंबेडकर यांनी छोटय़ा-मोठय़ा पक्ष संघटनांना एकत्रित करुन गेल्या लोकसभा निवडणुकीत १५ पक्षांनी रिडालोसची स्थापन केली. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर जानेवारी २०१८ मध्ये त्यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली.

कोरेगाव भीमा प्रकरणानंतर त्यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि त्याला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यांना मिळालेल्या या मोठ्या प्रतिसादामुळे त्यांचं राजकीय वजन पुन्हा वाढल्याची चर्चा होती. पण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी एमआयएम सोबत हात मिळवला आणि अनेकांना धक्का बसला. काँग्रेस-राष्ट्रवादी त्यांना आघाडीत आणण्यासाठी प्रयत्न करत होती. पण त्यांना यश आलं नाही.

आणखी बातम्या

 “महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

“महाराष्ट्रात येत्या १५ दिवसांत...”, अजित पवारांबाबत चर्चांना उधाण असतानाच सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

Supriya Sule on Ajit Pawar: अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निमित्ताने महाराष्ट्रात सध्या राजकीय उलथापालथ सुरु असताना दुसरीकडे सुप्रिया सुळे (Spriya Sule) यांनी मोठं विधान केलं आहे. येत्या 15 दिवसांत

Apr 18, 2023, 12:24 PM IST
Prakash Ambedkar : औरंगजेब या मातीलले नाहीत का? प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar : औरंगजेब या मातीलले नाहीत का? प्रकाश आंबेडकर असं का म्हणाले?

Prakash Ambedkar : संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो झळकल्याने वाद सुरु झाला आहे. या वादावरच आता प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

Mar 05, 2023, 20:44 PM IST
Ajit pawar says mahavikas aghadi doesnt have allience with prakash ambedkar

Ajit Pawar: ''आंबेडकरांची युती मविओसोबत नाही'' - अजित पवार

Ajit pawar says mahavikas aghadi doesnt have allience with prakash ambedkar

Feb 16, 2023, 21:30 PM IST
Prakash Ambedkar was managed in 500 crores

प्रकाश आंबेडकर 500 कोटीत मॅनेज झाले

Prakash Ambedkar was managed in 500 crores

Jan 31, 2023, 20:35 PM IST